जेडी लाईफ सेव्हर कोर्सचे आज ऑनलाईन उद्घाटन

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर, दि.15 :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय व जे डी स्पोर्ट्स फाउंडेशन द्वारा उद्या (दि.14 ऑगस्ट) लाईफ सेव्हर कोर्स अभ्यासक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे.
आपत्तीच्या काळामध्ये जिवीतहानी टाळण्यासाठी लाईफ सेव्हर कोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचे उद्या सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये उद्घाटन होणार आहे. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. तसेच जिल्हाधिकारी विमला आर. मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर प्रथम सत्रामध्ये दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान रूबी हॉल क्लिनिक, पुणे येथील डॉक्टर पी. केसकर हे अपघात आणि प्रथमोपचार याबाबत माहिती देतील. त्यानंतर दुपारी 1 ते 2 या दरम्यान जेडी लाईफ सेव्हरची भूमिका यावर निवृत्त सहसंचालक क्रीडा विभाग डॉ. जयप्रकाश दुबळे मार्गदर्शन करतील.