जि प शाळा चिंचोली व ग्रामपंचायत चिंचोली येथे 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

✒संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
सांगली/चिंचोली,दि.15 ऑगस्ट:- सांगली जिल्हातील शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत चिंचोली येथे भाराताचा 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहवर्धक वातावरण साजरा करण्यात आला.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्ताने चिंचोलीचे ग्राम पंचायतचे सरपंच फत्तेसिंग जाधव व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुलाणी सर यांच्या हस्ते धोजारोहण करण्यात आले.
त्यानंत आरोग्य विभाग यांच्या वतीने तंबाखू मुक्त गाव अभियानाची शपथ घेण्यात आली.
व्यसनामुळे आज अनेक परिवार उद्वस्त होत आहे. तंबाखू मुक्त गाव अभियान गाव पातळीवर राबण्याचे पण या स्वातंत्र्य दिनी घेण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. पुजा सातपुते व अश्विनी कोतेकर ए यु एम यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उप सरपंच रुपाली जाधव, शाळा समिती अध्यक्ष सुनील घोलप, उपाध्यक्ष रूपाली जाधव, ग्राम पंचायत सदस्य पै राहुल जाधव, पै गणेश जाधव, अमोल जाधव, अमृत जाधव आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.