७५ व्या स्वातंत्र दिनानिमित्त “मोफत आरोग्य शिबीर” संपन्न

७५ व्या स्वातंत्र दिनानिमित्त “मोफत आरोग्य शिबीर” संपन्न

७५ व्या स्वातंत्र दिनानिमित्त “मोफत आरोग्य शिबीर” संपन्न
७५ व्या स्वातंत्र दिनानिमित्त “मोफत आरोग्य शिबीर” संपन्न

गुणवंत कांबळे,मुंबई प्रतिनिधी

मो. नं. ९८६९८६०५३०

१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय लोकसत्ताक संघटना , लोक हितकारिणी संस्था (रजि), आणि आदर्श सामाजिक प्रतिष्ठान’ (रजि) तसेच ‘संलग्न संस्कार सेवा संस्था / कल्यानी जैन भावी संस्था’ या सर्व उपरोक्त संघटनेच्या माध्यमातून ७५ व्या स्वातंत्र दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे संस्थेकडुन ‘लोकसत्ताक स्टडी सेंटर’ मुंबई ‘तक्षशिला बुद्ध विहार’ सायन ठिकाणी आरोग्य शिबीर राबविण्यात आले.
शिबिरात देण्यात आलेल्या सुविधा – बी.पी. डॉक्टरांचा सल्ला,डिजिटल ईसीजी,डोळे तपासणी (कमीत कमी दरात चष्मा वाटप ) दम्याची तपासणी, बी.एम.आय.,कानाची मशीन ₹६५०फक्त सुविधा उपलब्ध होत्या. तसेच संस्थेकडून मोफत (डोळे) मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, (कॅन्सर ) मोफत कॅन्सर सर्जरी , (किडनी) मोफत किडनी सर्जरी,किडनी डायलेसिस,किडनी सर्जरी , ( हृदय ) एन्जोग्राफी ( कमी किमतीत ) मोफत एन्जोप्लॉस्टी ( बायपास ) वाँल सर्जरी /प्रेस मीटर सर्जरी अश्या प्रकारे संस्थेकडून मोफत ऑपरेशन व आरोग्य शिबिरात सुविधा देण्यात आले.
आरोग्य शिबिराला लोकांचा चांगला प्रतिसाद व सहभाग घेऊन आयोजकांचे कौतुकास्पद उपक्रम पाहून लोकांनी उपक्रमाची दखल घेऊन संघटनेचे स्तुतीय कामगिरीची वाह-वाह करण्यात आली.
तसेच स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून संलग्न आदर्श सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करून स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आरोग्य शिबिरांमध्ये सेवा देणारे डॉक्टर समनव्य असलेले कर्मचारी यांचे संघटनेच्या वतीने संविधान प्रास्ताविका (उद्देशिका) प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष मा.अमोलकुमार बोधिराज सरांनी आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर आणि कर्मचारी सेवा देणारे यांचे आभार व्यक्त केले. आणि उपस्थित असलेल्या संस्था, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित स्थानिक लोकांनचे देखिल सर्व संलग्न संघटनेच्या माध्यमातून सर्वाचे आभार प्रदर्शन करण्यात आले.
उपक्रमात सहभागी झालेले पदाधिकारी कार्यकर्ते मा.अमोलकुमार बोधिराज, दिवाकर कदम,वैभव मोहिते, मनिष जाधव ,सुबोध सकपाळ, दिपक जाधव,नरेश कांबळे, सुशिल कदम, विशाल गायकवाड, सुप्रिया जाधव (मोहिते ),किरण गमरे, पिलाजी कांबळे, सनी कांबळे, मंगेश खरात,मितेश वळंजू,प्रेमसागर बागडे,कमलेश मोहिते, मयुरेश जंगम,जान्हवी सावर्डेकर,नंदिनी कांबळे,स्मृती कांबळे, भाऊसाहेब सावंत,संदीप आंग्रे, रुपाली खळे,योगेश कांबळे, स्वरांगी मर्चंडे तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.