भारत चोक येथे शिक्षण सभापती श्री राधेश्याम अडनिया यांच्या हस्ते ध्वजारोहण.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा:- भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन.. संपूर्ण देशवासियांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला. 15 आँगस्ट २०२१ रोजी सकाळी ठिक 7 :45 वाजता राधेश्याम अडनिया यांच्या हस्ते राजुरा येथे ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी खरं तर हे आमचे सौभाग्याचं आहे की आम्ही या भारताच्या पवित्र भूमीवर जन्मलो आणि स्वातंत्र्याच्या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशप्रेम एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये असणं आवश्यक आहे. काही लोकं निव्वळ स्वतःच्या स्वार्थापोटी आपल्या देशाला भ्रष्टाचारात व्यापून देशातील भोळी भाबडी जनतेला दिशाभूल करीत आहे. आपल्याला एकत्र होऊन अश्या भ्रष्ट लोकांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि या भ्रष्टाचार रुपी रावणाचे दहन लवकरात लवकर केले पाहिजे.
भारतवर्षाला पूर्वी सारखे सुवर्ण पक्ष्यासारखे बनवायचे आहे आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजायचा आहे, प्रत्येक भारतीयाला आपल्या अधिकारांपेक्षा आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवं, तरच आपले देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल. हेच सर्वांचे उद्दिष्ट असले पाहिजे.
या प्रसंगी श्री गणेश रेकळवर माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अशोकराव निलेश गांपावर बंडू कपाटे सुरेश गांपावर गुडू मुकसिद्ध बियाबानी असख्य वॉर्डातील जनता तसेंचवरडातील तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते