एटापल्ली येथे रानभाजी महोत्सव साजरा

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधीं
(ग्रामीण)
मो.नं.९४०५७२०५९३
एटापल्ली : – एटापल्ली जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून, तालुका कृषी विभाग व आत्मा च्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14/8/2021 ला एटापल्ली येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा जनार्दन नल्लावार उपसभापती प स एटापल्ली व उदघाटक मा शेवाळे साहेब तहसिलदार एटापल्ली हे होते, याप्रसंगी बोलताना , रानभाज्यांचे संवर्धन आणि व्यावसायिकरण होणे आवश्यक असून यामुळे गरिबांना, बचत गटांना याचा फायदा होईल असे मत शेवाळे साहेब तहसिलदार एटापल्ली यांनी व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुणे दौलतभाऊ दहागावकर तालुकाध्यक्ष रा कांँ पार्टी एटापल्ली यांनी बोलताना रानभाज्या ह्या फक्त रानभाज्याच नसून औषधी वनस्पती सुद्धा आहेत ,याचे जतन झाले पाहिजे दिवसेंदिवस जंगलात लागणाऱ्या आगीमुळे रानभाज्या चे बीज नष्ट होत असून त्या दुर्मिळ होत आहेत त्यांचे बीज,रोपआणुन लागवड करून गावभाज्या करुया ,वास्त्याचा(बांबु) वापर फक्त भाजीकरीता न करता त्याचे संवर्धन करुन घरगुती साहित्याकरिता करावा, करटोलीचे व ईतर बीजपुरवठा कृषी विभागाकडून उपलब्ध करून द्यावा असे मत व्यक्त केले मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून मा वहाने साहेब बीडीओ प स एटापल्ली ,मा गायकवाड साहेब तालुका कृषी अधिकारी एटापल्ली,मा रविभाऊ रामगुंडेवार पत्रकार (लोकमत), मा रामजी कत्तीवार माजी जी प सदस्य,मा लक्ष्मण नरोटे रा कांँ तालुका सचिव ,मा विजुभाऊ अतकमवार शहराध्यक्ष,अभय पुण्यमुर्तीवार, होडबे साहेब मंडळ कृषी अधिकारी, राऊत साहेब, आदी मान्यवर उपस्थित होते तसेच जिवनगट्टा, गुरुपल्ली मरपल्ली,एटापल्ली, मरकल, उडेरा, येथील बचतगटांचे महिला, पुरुष सदस्य यांनी रानभाज्यांचे स्टाॅल लावुन उपस्थित होते प्रास्ताविक गायकवाड साहेब यांनी व आभार प्रदर्शन मंडलकृषी अधिकारी यांनी केले, या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता तालुका कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले