मानधन नको, वेनत द्या,’ आशा वर्कराचे नागपुर मध्ये आंदोलन

58

मानधन नको, वेनत द्या,’ आशा वर्कराचे नागपुर मध्ये आंदोलन 

 

पल्लवी मेश्राम

नागपुर:- आम्हाला मानधन नको, शासकीय कर्मचा-या नुसार वेनत द्या, आम्हाला कोरोना काळात सुरु असलेल्या कामाबदल 300 रोजा नुसार वेतन देण्यात यावे. अशी मागणी करत आशा वर्कर संघटनेने शहराच्या वेगवेगळ्या भागात निदर्शने केली.
‘मानधन नको, वेनत द्या,’ अशी मागणी करत नागपुरातील आशा वर्कर संघटनेने शहराच्या वेगवेगळ्या भागात निदर्शने केली.
आशा वर्कर आणी संघटना समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आशा वर्कर यांच्या संघटनेने रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारून आंदोलन केले. या संपाच्या माध्यमातून आशा वर्करच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यात आल्या.
आरोग्य, पोषण व शिक्षण यासारख्या मूलभूत सेवांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव मागे घ्या, आयसीडीएस, एनएचएम,(राष्ट्रीय आरोग्य अभियान) माध्यान्ह भोजन आदी केंद्रीय योजनांवरील केंद्राच्या आर्थिक तरतुदीत भरीव वाढ करून त्या कायम करा, भारतीय श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार आशा-गटप्रवर्तकसहित सर्व योजना कर्मचाऱ्यांना कामगार म्हणून मान्यता देऊन त्यांना २१ हजार रुपये किमान वेतन, १० हजार रुपये मासिक पेन्शन व इएसआय, पीएफ लागू करा आदी मागण्या निवेदन देऊन करण्यात आल्या.