महाराष्ट्र: अल्पवयीन विवाहितेने सासरी नांदण्यास दिला नकार, जन्म दिलेल्या बापानेचे लेकीला नदीत फेकल.

✒MVN क्राईम रिपोर्टर✒
कोल्हापूर,दि.17 ऑगस्ट:- कोल्हापुर जिल्हातुन संपुर्ण महाराष्ट्राला हादवळणारी बातमी समोर आली आहे. कोल्हापुर येथील अल्पवयीन विवाहीतेने सासरी नांदायला नकार दिला, त्यामुळे अल्पवयीन मुलीला स्वता जन्मदिलेल्या बापानेच नदीत फेकल्याचा संशय आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिस ठाण्यात हद्दीत ही संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी मुलीच्या बापाला ताब्यात घेतलं आहे. चार दिवसांपूर्वी अल्पवयीन विवाहीत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. आता मुलीचा मृतदेह दूधगंगा नदी पात्रात आढळून आला आहे.
काय आहे हा प्रकार
कोल्हापुर जिल्हात एक मुलगी अल्पवयीन असतानाही बापाने तिचा विवाह जबरदस्ती लावून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. सासरी नांदायला नकार दिल्याने बापानेच तिला नदीत ढकलून जीवे मारल्याची प्राथमिक माहिती आहे. चार दिवसांपूर्वी पित्यानेच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कोल्हापुरातील कुरुंदवाड पोलिसात दिली होती.
दूधगंगा नदी पात्रात आढळला विवाहितेचा मृतदेह.
बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय मुलीचा मृतदेह दूधगंगा नदी पात्रात आढळला आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. कुरुंदवाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.