गोंडपीपरी कृषी विभागाच्या वतीने” स्मार्ट काॅटन ” शेतशाळेचे आयोजन*

*गोंडपीपरी कृषी विभागाच्या वतीने” स्मार्ट काॅटन ” शेतशाळेचे आयोजन*

गोंडपीपरी कृषी विभागाच्या वतीने" स्मार्ट काॅटन " शेतशाळेचे आयोजन*
गोंडपीपरी कृषी विभागाच्या वतीने” स्मार्ट काॅटन ” शेतशाळेचे आयोजन*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी कृषी विभागाचा ” स्मार्ट काॕटन ” अंतर्गत अडेगावात शेतशाळा घेण्यात आली.यात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.कापुस पिकावरील बोंड अळीचे नियंत्रण,शत्रु,मित्र किड्यांची माहीती शेतकऱ्यांना देण्यात आली. अडेगाव येथिल चंपत देवाजी ठाकुर यांच्या नियोजित शेतीशाळेत ” स्मार्ट कॉटन ” अंतर्गत कापुस पिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. शेतातील कापूस पीक निरीक्षणे,मित्र कीड ,शत्रु कीड याबाबत ओळख करून देण्यात आली. कापूस पिकावरील बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करून गुलाबी बोंड अळीचे पिकावरील नुकसान कसे टाळायचे,यावर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच फेरोमेन ट्रॅप बाबत माहिती देण्यात आली. शेतीशाळेत मंडळ कृषि अधिकारी गोलाईत यांनी एकात्मिक खत व्ययस्थापन बाबत माहिती दिली. कृषि पर्यवेक्षक टोंगलवार यांनी कापूस पिकावरील बोन्ड अळीचे व्यवस्थापन मार्गदर्शन केले. पेंदोर कृषि सहाय्यक यांनी शेतीशाळेचे आयोजन करून फेरोमेनट्रॅप बाबत माहिती प्रात्यक्षिक करून दाखविले.शेतीशाळेच्या आयोजनासाठी कृषि मित्र भगीरथ नागापुरे यांनी विशेष सहकार्य केले.