*” आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी ” विशेषांकाचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न*

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
लातूर – महिलांनी उच्च शिखरे पादाक्रांत केले पाहिजे आज महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा कमी नाहीत. आज खऱ्या अर्थाने महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल पुढेच आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केले. साप्ताहिक समृध्द व्यापार संपादित ” आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी ” या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साप्ताहिक समृध्द व्यापारचे मुख्य संपादक दत्तात्रय जी. परळकर, उपसंपादक, संतोष सोनवणे, पत्रकार संजय राजुळे, पत्रकार संग्राम वाघमारे, शिवलिंग जेवळे, वाडकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमामधे कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह, गौरवपत्र व विशेषांक असे पुरस्काराचे स्वरुप होते. उद्योजीका उर्मिला बिराजदार, संचालिका प्रिती शहा, ब्युटीशियन रोहिणी बिराजदार, प्राचार्या डॉ. आशा मुंडे, सामाजिक कार्यकर्त्या मानिषा कोकणे, उद्योजिका शिला वाघमारे, ग्रामसेविका शोभा भोजने, प्रगतशील शेतकरी मंगल वाघमारे, उद्योजिका प्रितम जाधव, उद्योजिका सुवर्णा जोशी, प्राचार्या डॉ. शामलिला बावगे, युवा खेळाडू सुरेखा गिरी, न्युट्रीशियन निता खेडकर, ॲड. रेणुका महाळंगीकर, सलग चोविस तास नृत्य करणारी सृष्टी जगताप, आदर्श सरपंच रेणूका हावगीराव तोडकरी आदी महिलांना सन्मानीत करण्यात आले.