मुंबईत पीएफ ऑफ़िसमध्ये झाला कोरोडोचा घोटाळा उघड; कर्मचाऱ्याने लाटले तब्बल 21 कोटी.

मुंबईत पीएफ ऑफ़िसमध्ये झाला कोरोडोचा घोटाळा उघड; कर्मचाऱ्याने लाटले तब्बल 21 कोटी.

मुंबईत पीएफ ऑफ़िसमध्ये झाला कोरोडोचा घोटाळा उघड; कर्मचाऱ्याने लाटले तब्बल 21 कोटी.
मुंबईत पीएफ ऑफ़िसमध्ये झाला कोरोडोचा घोटाळा उघड; कर्मचाऱ्याने लाटले तब्बल 21 कोटी.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.19 ऑगस्ट:- मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस प्रादुर्भाच्या संकटाच्या काळात लोकांना मदत व्हावी या हेतूने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली होती. मुंबईतील कांदिवली येथील पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने याचाच गैरफायदा घेत तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे अंतर्गत लेखापरीक्षणात समोर आले आहे.

तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा मुंबईतील कांदिवली येथीस पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने केल्याचे अंतर्गत इंटरनल ऑडिटमध्ये उघडकीस आले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ ही जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक सुरक्षा संघटनांपैकी एक आहे, मार्च 2020 ते जून 2021 दरम्यान सगळ्या देशाचे लक्ष कोरोनाच्या साथीकडे आणि लॉकडाऊनवर होते, त्याच काळात या घोटाळ्याचा मास्टरमाईंड कांदिवली येथील पीएफ कार्यालयातील 37 वर्षीय लिपिक चंदन कुमार सिन्हा याने ही अफरातफर केली.

लॉकडाऊनदरम्यान घरीच राहण्याचा पर्याय निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन प्रणालीसाठीचे आपले पासवर्ड या अधिकाऱ्याला दिले आणि नंतर ते बदलण्याची तसदी घेतली नाही. तसेच सिस्टीममधील काही त्रुटींचा त्याने उपयोग केला. पीएफमधून 5 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील, तर वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या दुसऱ्या पडताळणीनंतरच त्याला मंजुरी दिली जाते. पण एक ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या दाव्यांसाठी अशी तरतूद नाही. लेखा परीक्षणातील तरतुदीं बाबतही माहिती होती.

दरम्यान, अंतर्गत लेखापरीक्षणाची व्याप्ती ईपीएफओने वाढवली असून, कार्यालयीन प्रणालीच्या वापराबाबतही अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बँकांना ही 817 बँक खाती गोठवण्यासाठी पत्र लिहिले आहे. तसेच आतापर्यंत 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मागोवा घेऊन, ती वसूल करण्यात आली आहे.