नागपुर: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने स्वतःचा गळा चिरला.

नागपुर: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने स्वतःचा गळा चिरला.

नागपुर: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने स्वतःचा गळा चिरला.
नागपुर: आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने स्वतःचा गळा चिरला.

✒️युवराज मेश्राम ✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर:- नागपुर मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील एका वृद्ध महिलेने स्वतःचा गळा चाकूने चिरुन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी दाभा परिसरात उघडकीस आली. मोहर मुन्नी सिंह वय 70, रा. अशोक एन्क्लेव्ह, दाभा असे आत्महत्या केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

पोलिसांनकडुन प्राप्त माहितीनुसार, मोहर मुन्नी सिंह या मुलगा, सून व सहा वर्षांच्या नातीसह राहते. मुलगा वाहतूक व्यावसायिक असून व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेला आहे. त्यामुळे घरात सून व सहा वर्षांची मुलगी होती. मंगळवारी सकाळी सून झोपेतून उठली असता स्वयंपाक घराच्या बाजूला असलेल्या वॉश बेसीनजवळ सासू रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. सुनेने ताबडतोब पतीला फोन करून माहिती दिली. पतीने शेजारच्यांना कॉल करून मदत करण्याची विनंती केली. शेजाऱ्यांनी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केला असता वृद्धेच्या गळ्यात चाकू घुसलेला होता. प्रथमदर्शनी हा खून असावा, असे वाटले. पण, घरात तसे कोणतेच पुरावे सापडले नाही. कसून चौकशी करण्यात आली. पण, पोलिसांना काहीच सापडले नाही. वृद्धेला खोकला, गुडघेदुखी आणि मधुमेहासारखे इतर आजार होते. गेल्या काही दिवसांपासून खोकला थांबत नव्हता. यामुळे महिला त्रस्त होती. रात्री ती खूप खोकत असल्याचा आवाज इमारतीच्या सुरक्षारक्षकाला आला. त्याने सिटी वाजवली असता अचानक आवाज बंद झाला. वृद्धेने आजारपणाला कंटाळून स्वयंपाक घरातील चाकू स्वत:च्या गळ्यावर मारून घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात गिट्टीखदान पोलिसांनी ही आत्महत्या दिसून येत असल्याचे सांगितले असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.