नागपुर: परदेशी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नागपुर: परदेशी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नागपुर: एकलव्य निवासी शाळेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ.
नागपुर: एकलव्य निवासी शाळेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.19ऑगस्ट:- महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 1 ऑगस्ट पर्यंत होती.

परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती याजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन विद्यार्थ्यांनी किंवा एचटीटीपीएस कोलन हॅश एसजेएसं डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन तो परीपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संचालनालय, पुणे या पत्त्यावर दि. 31 ऑगस्ट 2021 सायं. 5.00 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष सादर करण्यात यावेत.

या योजनेच्या अटी, शर्ती व लाभाचे स्वरूप हे विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग शासन निर्णय दिनांक 11 आक्टोबर, 2018 मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील. अर्जाचा नमूना व सविस्तर माहितीसाठी डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले आहे.

विभागातील एकूण 23 विद्यार्थ्यांची निवड
2021 – 22 या शैक्षणिक वर्षाकरीता राज्यातून एकूण 75 विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. या यादीमध्ये नागपूर विभागातील एकूण 23 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.नागपूर जिल्ह्यातील -16 ,भंडारा जिल्ह्यातील -4, गोंदिया जिल्ह्यातील- 1, चंद्रपूर जिल्ह्यातील -2 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. परदेश शिष्यवृत्ती करीता निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन समाजकल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.