युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे शुक्रवार दि. २० रोजी ऑनलाईन मार्गदर्शन

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अकोला :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबईमार्फत जिल्हातील युवक-युवतींसाठी युपीएसी, एमपीएसी स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन शुक्रवार दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत करण्यात आले आहे. या वेबीनारमध्ये सातारा जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी सोपान टोपे, मुंबई येथील शिक्षण तज्ज्ञ डॉ. आनंद पाटील, गंगटोक (सिक्कीम पूर्व) येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार निखारे यांचे प्रमुख मार्गदर्शन राहणार आहे. तसेच स्पर्धा परिक्षेबाबत काही प्रश्न असल्यास प्रश्नाचे निरासण करणेसाठी दुपारी ४.१५ ते ४.३० या वेळेत प्रश्न विचारु शकता.
अधिक माहितीसाठी फेसबुक लिंक https://www.facebook.com/MaharashtraSDEED तसेच युट्युब लिंक https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A वर लॉगइन होऊन या वेबीनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.