सांगली जिल्हातील पूरबाधितांच्या बँक खात्यावर जमा झाले 73 लाख रुपये.

सांगली जिल्हातील पूरबाधितांच्या बँक खात्यावर जमा झाले 73 लाख रुपये.

सांगली जिल्हातील पूरबाधितांच्या बँक खात्यावर जमा झाले 73 लाख रुपये.
सांगली जिल्हातील पूरबाधितांच्या बँक खात्यावर जमा झाले 73 लाख रुपये.

संजय कांबळे ✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362

सांगली,दि.19 ऑगस्ट:- महाराष्ट्रातील काही जिल्हात मोठ्या प्रमाणात महापुर आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीटहानी आणि जीवीतहानी झाली होती. त्यात सांगली जिल्हात महापुरामुळे पाणी घरात शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबाला 10 हजार रुपये मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आतापर्यंत 736 परिवाराला 73 लाख 60 हजार रुपयांची आर्थिक मदत बॅंक खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, शिराळा तालुक्यातील 736 पूरबाधित परिवाराच्या बॅंक खात्यांवर रुपये 73 लाख 60 हजार इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

वाळवा तालुका व अपर आष्टा तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पूरबाधित कुटुंबांना अनुक्रमे 3 कोटी 60 लाख आणि 1 कोटी 23 लाख प्रमाणे अनुदान वाटप करण्यासाठी बॅंकेत जमा करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

पलूस तालुक्यात 4 कोटी 79 लाख 10 हजार रुपये, अपर तहसीलदार, सांगली ग्रामीण क्षेत्रामध्ये 03 कोटी 11 लाख, मिरज तालुक्यात 53 लाख 30 हजार, सांगली-मिरज महानगरपालिका क्षेत्रासाठी 09 कोटी 73 लाख एवढे अनुदान लवकरच बॅंकेमध्ये जमा होत असून, लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल.
जिल्ह्यातील 22 हजार 994 पुरबाधित परिवाराच्या खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसांत रक्कम जमा होणार असून, उर्वरित बाधित कुटुंबांना अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत शासनाकडे अनुदान मागणी करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.