बल्लारपूर कळमना गावाजवळ गोवंश ची तस्करी करणाऱ्या ट्रकला पकडले
ट्रकमध्ये 40 गाई असल्याचा अंदाज

ट्रकमध्ये 40 गाई असल्याचा अंदाज
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
बल्लारपूर खलील वृत्त या प्रमाणे आहे: बल्लारपूर-गोंडपीपरी मार्गावर कळमना गावाजवळ आज गुरुवारी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान गायींनी भरलेला ट्रक क्र. MH 40 BL 2451 राष्ट्रीय महामार्गावरील दहेली कळमना येथे पोलिसांनी पकडले .ट्रकमधून 40 गायींची सुटका करण्यात आली. सदर गायी या तेलंगाना राज्य नेण्यात येत होते.
गायींनी भरलेला ट्रक क्र. MH 40 BL 2451 एका ट्रक मधून गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच बल्लारपूर येथील विश्व हिंदू परिषदेचे व बजरंग दलाचे कार्यकर्ते व गावकरी यांनी ट्रकचा पाठलाग करून कळमना गावाजवळ गोवंशाची तस्करी करीत असलेल्या ट्रक ला पकडले. या ट्रकची पाहणी केली असता यात 40 गोवंश आढळून आले या प्रकाराची माहिती बल्लारपूर पोलिसांना दिली असता सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेंद्र तिवारी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाई बल्लारपूर पोलिस व विश्व हिंदू परिषदेचे व बजरंग दलाचे कार्यकर्ते व गावकरी बल्लारपूर गोरक्षक कार्यकर्ता कैलास जोरा, सत्यनारायण खेंगर, राज निषाद, अमित चक्वरती, प्रशांत दारला, विकी मांढरे, विशांत ठाकूर, शशांक ठाकूर, जय ठाकूर, संदीप ठाकूर इत्यादी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात आली. तसेच गायींना लोहारा येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे.