ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प सर्वाधीक रोजगार देणारे केंद्र ठरावे – आ. किशोर जोरगेवार
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दीर्घकालीन आराखडा विजन करण्यासाठी भागीदारांचे चर्चासत्र

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दीर्घकालीन आराखडा विजन करण्यासाठी भागीदारांचे चर्चासत्र
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
ताडोबा : -खलील वृत्त या प्रमाणे आहे ताडोबा अंधारी व्याघ प्रकल्पाचा दीर्गकलिंन आराखडा व्हिजन कारणासाठी भागीदाराचे चर्चासत्र
चंद्रपूर : मागील अनेक वर्षापासून आम्ही या भागाचे संरक्षण व संवर्धन केले आहे. त्यामूळे या भागाचा 20 वर्ष पर्यंतचा आराखडा तयार करत असतांना येथील स्थानिकांचाही विचार केला गेला पाहिजे. ताडोबा अभयारण्य हे रोजगार निर्मितीचे केंद्र आहे. त्यामूळे येथील कामात स्थानिकांना 80 टक्के रोजगार देत, येत्या 20 वर्षात हे व्याघ्र प्रकल्प सर्वाधीक रोजगार देणारे केंद्र ठरावे या दिशेने नियोजन करण्यात यावे असे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाद्वारा आयोजीत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दीर्घकालीन आराखडा विजन 2040 भागीदारांच्या चर्चासत्र कार्यक्रमात व्यक्त केले.
ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दीर्घकालीन आराखडा विजन 2040 तयार करण्यासाठी वन विभागाच्या वतीने भागीदारांचे चर्चासत्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. एच. काकोडरकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये, हुडा, जितेंद्र रामगावकर, गुरुप्रसाद आदि वन विभागाच्या अधिका-यांसह इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, संजय डीमोले, यांच्यासह सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
या चर्चा सत्रात पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, आपण ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दीर्घकालीन आराखडा दया