सोशल मीडिया मध्ये फॉलोअर्स वाढवण्यासाठी स्टंटबाजी, वाहनांसह स्टंटबाज अटकेतसोशल मीडियात स्टंटबाजी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

सोशल मीडिया मध्ये फॉलोअर्स वाढवण्यासाठी स्टंटबाजी, वाहनांसह स्टंटबाज अटकेतसोशल मीडियात स्टंटबाजी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे

सोशल मीडिया मध्ये फॉलोअर्स वाढवण्यासाठी स्टंटबाजी, वाहनांसह स्टंटबाज अटकेतसोशल मीडियात स्टंटबाजी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे*
सोशल मीडिया मध्ये फॉलोअर्स वाढवण्यासाठी स्टंटबाजी, वाहनांसह स्टंटबाज अटकेतसोशल मीडियात स्टंटबाजी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर, 21 ऑगस्ट :- नागपुरात पुन्हा स्टंटबाज तरुणांचा उच्छाद पहायला मिळत आहे. दुचाकी आणि पोर व्हीलर्स सोबत स्टंटबाजी करत सोशल मीडियात व्हिडीओ अपलोड करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणाची नागपूर पोलिसांनी गंभीर दखल घेत या स्टंटबाज तरुणांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

नागपूरमध्ये परत एकदा स्टंटबाजाचा रस्त्यावर उच्छाद पाहायला मिळाला. सदर आणि सिव्हील लाईन भागात या स्टंटबाजांनी कारच्या स्टंटचे व्हिडीओ तयार केले. हे व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले. सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे स्टंटबाज या उचापती करत असल्याचे तपासात पुढे आले आहे.

त्यांच्या या स्टंटमुळे त्यांच्या स्वत:सह इतरांचा पण जीव धोक्यात येतो. या संदर्भात नागपूर वाहतूक पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांचे नाव मोहनिस अहमद, विक्की जागडे, मोहनिस खान व अहमद पिजारे अशी आहेत. पोलिसांनी या आरपींकडून स्टंटसाठी वापरलेली वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहेत.

सोशल मीडियात आपले फॉलोअर्स वाढावेत म्हणून हे तरुण अशा प्रकारचे स्टंट करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. या तरुणांच्याकडील मोबाइल फोनमध्ये इतरही ठिकाणी स्टंटबाजी केल्याचे व्हिडीओ पोलिसांना आढळून आले आहेत. या तरुणांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. अटक करण्यात आलेले हे सर्व आरोपी 25 वर्षांखालील आहेत