राष्ट्रीय महामार्ग जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात शेतकऱ्याची होऊ शकते फसवेगिरी

राष्ट्रीय महामार्ग जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात शेतकऱ्याची होऊ शकते फसवेगिरी

राष्ट्रीय महामार्ग जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात शेतकऱ्याची होऊ शकते फसवेगिरी
राष्ट्रीय महामार्ग जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात शेतकऱ्याची होऊ शकते फसवेगिरी

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३०(ड) आणि ३५३(ब)या रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी भूमिअधिग्रहण विषयी प्रक्रिया सुरू आहे. शासनाने विविध वृत्तपत्रात ३- क अधिसूचना प्रसिद्ध केली असून कोणकोणत्या शेतकऱ्यांचे किती क्षेत्र अधिग्रहित होणार याबाबत विस्तृत माहिती यात दिली आहे.मात्र ३- ड अधिसूचना प्रसिद्ध होणे बाकी असून नेमका किती मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येईल ही बाब ३- ड अधिसूचनेतच कळेल. त्याआधीच जे लोक इतकी रक्कम मिळेल, त्यावर इतकी दरवाढ मिळेल, असे सांगून आपल्याला मोहात पाडत आहे त्यांच्यापासून सावध रहावे असे आवाहन आड.दीपक चटप यांनीच्या माध्यमातून संबंधितांना केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गासाठी ज्यांच्या जमिनीचा काही भाग अधिग्रहित होणार आहे अशा शेतकर्‍यांशी काही बाहेरची मंडळी येथे येऊन संपर्क साधत आहे.आणि शासनाकडून मिळणारा मोबदला, रकमेत वाढ करून देण्याची हमी देत आहे. “विशेष म्हणजे अधिकारी वर्गाशी आमची ओळख असून आपल्याला दरवाढ हमखास मिळेल” असे ही ते आवर्जून सांगत आहे. शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला उचलून घ्यावा आणि त्यानंतर दरवाढ मिळावी म्हणून आम्ही नागपूरात शेतकऱ्यांचे प्रकरण चालवू त्यासाठी शेतकऱ्यांनी सुरवातीला ५ हजार रुपयांचा चेक “सेवा करारनामा” (अग्रीमेंट)करावा आणि जी काही दरवाढ होईल त्यातील १० टक्के रक्कम आम्हाला द्यावी.” असे त्या मंडळींचे म्हणणे असल्याचे कळते. विशेष म्हणजे १८ महिन्यात दरवाढ मिळवून देऊ अशी हमी ते देत आहे. त्यासाठी कोरा चेक सेक्युरीटी म्हणून शेतकऱ्यांना मागितले जात आहे. या पार्श्वभूमीवर माझी आपल्या भागातील शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की, कोणासोबतही दरवाढी संदर्भात कोणताही करार करू नका, ही माहिती शेतकरी बांधावा पर्यन्त माहिती दिली आहे