जनपूर्ती फाऊंडेशन तर्फे नागपुर मध्ये कोरोना बद्दल जनजागृती

52

जनपूर्ती फाऊंडेशन तर्फे नागपुर मध्ये कोरोना बद्दल जनजागृती

पल्लवी मेश्राम प्रतिनिधि

नागपुर:- आज नागपुर मध्ये कोरोना वायरसचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लोकांच्या मनात कोरोना बद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. लोकांच्या मनातील भीती काढण्याकरिता जनपूर्ती फाऊंडेशन तर्फे जनजागृती करण्यात आली.
जनपूर्ती फाऊंडेशन तर्फे नागपुरच्या सीताबर्डी पोलिस स्टेशन परीसरात कोरोना बद्दल जनपूर्ती फाऊंडेशन तर्फे जनजागृती करण्यात आली. त्यांत मास्क वापरा, स्वच्छता राखा, हात स्वच्छ धुवा, सैनिटायझर वापरा. आणी “स्वताःची काळजी स्वतःघ्या” असे संदेश देण्यात आला. त्यावेळी जनपूर्ती फाऊंडेशनचे संजना शाहू, सावन लोखंडे, संदेश मनोहरे, दीपक राजपूत, मयक बन्सोडकर, प्रथमेश बन्सोडकर आणी अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.