गोंडपीपरीत ओबीसी बांधवांची एकदिवसीय प्रबोधन कार्यशाळा

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- ओबीसी कृती समिती गोंडपीपरी तर्फे धनोजे कुणबी सभागृहात ओबीसी बांधवांची एक दिवसीय प्रबोधन कार्यशाळा पार पडली. तालुक्यातील शेकडो ओबीसी बांधवांची उपस्थिती होती. ओबीसी जनगणना समन्वय समितीचे बळीराज धोटे यांनी मार्गदर्शन केले.
ओबीसी कृती समिती गोंडपिपरी तर्फे एकदिवासीय प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन येथिल धनोजे कुणबी सभागृहात करण्यात आले होते.ओबीसीच्या शिक्षित युवकांना नोकरी का मिळत नाही ? या प्रश्वार चर्चासत्र रंगले.ओबीसी जनगणना समनव्य समिती चंद्रपुरचे बळीराज धोटे यांनी मार्गदर्शन केले. ओबीसी प्रवर्गातील शिक्षित युवकांना नोकरी न मिळण्याचे कारणे व त्यावरील उपाय यावर धोटे यांनी प्रकाश टाकला.
ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे,आपल्या देशात पशु प्राण्यांची जनगणना होते मात्र ओबीसीची जनगनना होत नाही अशी खंत धोटे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओबीसी कृती समितीचे पदाधिकारी सुनील फलके तर प्रास्ताविक बळीराज निकोडे यांनी केले.