मी तुझी गुलमोहर

मी तुझी गुलमोहर

मी तुझी गुलमोहर

जशा निसर्गात गुलमोहर फुलला, जीव माझा सप्नी आकाशात रंगला.
ढगांच्या कडकडाटासह पाऊस बरसला.
तुझा मिलनाचा जनु योगच आला.

मन कासाविस जस, ओलचिंब पाखरांचे रान.
ओड लागली तुझी किती रम्य झाले वातावरण.

आठवण आली तुझे रंग रुप पाहुनी
केव्हा येशिल कुशीत माझा जीव आला भरुन.

बघ तो गुलमोहर बहरला, जसा नभी इंद्रधनुष्य सजला
तुझा स्मित हास्याने जनु चेहराच उमजला.

ओड लागली तुझी जीवा,
जसा रंगीबेरंगी फुलपाखरांचा थवा
तुझा लावण्यात जनु गुलमोहर दिसला
तुझा सहवासाने जीवनात वसंत उमटला

बहरलेल रुप बघून तुझे. जसा तू माझा प्रियकर
कवटाळून घ्यावं असं जशी मी तुझी गुलमोहर

कवि मयूरी टेंभरे, रामेश्वरी, नागपुर