नंदोरी चौकातील उड्डाणपुलावर मॉर्निंग वॉक ला जाताना अज्ञात वाहनाने दिली धडक !

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट दि.22:- स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी विठ्ठल ज्ञानेश्वर लाटकर वय 48 वर्ष यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. अपघात हा पहाटेच्या वेळी 5 वाजता नंदोरी चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील उड़ाण पुलावर मॉर्निंग वॉकला जातांना पहाटे घडला असून यावेळी एका अज्ञात वाहनाने श्री लाटकर यांना धडक दिली.अपघातानंतर त्यांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

श्री लाटकर हे विकास विद्यालय कोरा येथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. आज दि.22 रोजी दुपारी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.