युवासेना विभागप्रमुख दीपक मारटकर हत्या राजकीय वैमनस्यातून, तरुणीसह तिघे ताब्यात*

54

*युवासेना विभागप्रमुख दीपक मारटकर हत्या राजकीय वैमनस्यातून, तरुणीसह तिघे ताब्यात*

*पुणे*- कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांची बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याची माहिती समोरआली आहे.दरम्यान,या खुनप्रकरणी आठ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. यामध्ये या तरुणीचाही समावेश आहे.

दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते घराबाहेर आले.

एका मित्रासोबत बसले असताना तीन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने तब्बल ४८ वार केले. जखमी अवस्थेत दीपक यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

२०१७ च्या महानगरपालिका निवडणूकित दीपक हे शिवसेनेच्या तिकिटावर उभे होते.यावेळी त्यांच्याविरोधात एक तरुणीही उभी होते. दरम्यान या दोघांचाही निवडणुकीत पराभव झाला. तेव्हापासून त्यांच्यात भांडण झाले. त्याचीच परिणीती या खुनात झाली.

या खुनप्रकरणी आठ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. यामध्ये या तरुणीचाही समावेश आहे. या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार ही तरुणीच असल्याची माहिती पुढे येत आहे.

या खून प्रकरणातील अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.