*बल्लारशाह वनपरिक्षेत्र परिसरात अवैधरित्या मुरूम उत्खनन*
*ट्रॅक्टर सोबत चार मजूर यांच्यावर व गुन्हा नोंद*

*ट्रॅक्टर सोबत चार मजूर यांच्यावर व गुन्हा नोंद*
सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपूर : – सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की ,बल्लारशाह वनपरिक्षेत्रात अंतर्गत नियतक्षेत्र कळमना मध्ये कक्ष क्र. 572 ( संरक्षित वन ) मध्ये कळमना क्षेत्र सहायक व वनरक्षक गस्त करीत असताना अवैधरित्या मुरूम खोदकाम करून वाहतूक करतांना दिसले असता नामे तुळशीराम लक्ष्मण घोडाम रा. बामनी यांच्या मालकीचे स्वराज ट्रॅक्टर क्र. MH 34 BF 9422 व ट्रॉली जप्तीची कार्यवाही करून प्राथमिक गुन्हा क्र. 08945/223603 दि. 16/08/2021 नुसार ट्रॅक्टर मालक तसेच नागेश रवींद्र पेंदोर राहणार कळमना ट्रॅक्टर चालक व इतर चार मजूर यांच्यावर व गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह श्री. संतोष थिपे यांचे मार्गदर्शनात श्री. भागीरथ पुरी, क्षेत्र सहायक कळमना , कु. एल. आर. प्रगतीवार वनरक्षक कळमना करीत आहे.