बंजारा समाजाचे धर्मगुरू राष्ट्रसंत रामराव महाराज यांना भारतरत्न देण्यात यावे.
केंद्राकडे तशी शिफारस करण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

केंद्राकडे तशी शिफारस करण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा प्रतिनिधी :– जिवती पंचायत समितीच्या सभापती अंजनाताई भिमराव पवार यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे बंजारा समाजाचे धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा अशी मागणी केली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे की रामराव बापू हे वयाच्या ९ वर्षापासुन देश सेवेसाठी असलेले अनमोल कार्य तसेच १५ करोड बंजारा समाजाचे एकमेव श्रध्दास्थान (बापु) आहेत. त्यांनी दारूबंदी, हुंडाबळी, अस्पशत: अंधश्रध्दा निर्मुलन, हिन्दू रक्षण, धर्मजागरूती इत्यादी सुधारणेसाठी अहोरात्र कार्य केले आहे. तसेच त्यांनी स्वतःचे आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणे बाबत पंचायत समिती सभापती यांनी विनंती केली आहे.
या मागणीची दखल घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे बंजारा समाजाचे धर्मगुरू राष्ट्रसंत रामराव महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे तशी शिफारस करण्यात यावी अशी मागणी केली आहे.