*महिला राष्ट्रवादी काँग्रेस एटापल्ली तर्फे सीआरपीएफ जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा*
शाहीनभाभी हकीम व पोर्णिमा ताई श्रीरामवार याचं नेतृत्वात साजरा केला सण

शाहीनभाभी हकीम व पोर्णिमा ताई श्रीरामवार याचं नेतृत्वात साजरा केला सण
अमोल रामटेके
अहेरी तालुका प्रतिनिधी,
9405855335
अहेरी : -महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली च्या वतीने सीआरपीएफ च्या १९१ बटालियन एटापल्ली येथे अधिकारी तथा जवानांना राखी बांधून पवित्र रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.
या वेळी सीआरपीएफ १९१ बटालियन चे द्वितीय कमान अधिकारी जे.एन.शेखावत,एस.एम.ओ.डॉ.विजयप्रसाद राव,बटालियन चे पोलीस निरीक्षक सत्यपाल अग्रवाल,एस.डी. कालाने तथा ईतर अधिकारी व जवान उपस्थित होते.
या वेळी शाहीनभाभी हकीम म्हणाल्या की देशाच्या रक्षनासाठी विविध प्रदेशातुन येऊन सिआरपीएफ चे अधिकारी व जवान इथे परम कार्य करीत आहे.देशसेवा करतांना आपल्या परिवाराला सोडून ते राहत असतात अनेक सणांपासून ते वंचित राहत असतात यामुळे जवान आणि अधिकारी यांना आपल्या बहिणींची उणीव भासू नये यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे हा सण इथे साजरा करत असल्याचे म्हणाल्या.
सीआरपीएफ चे द्वितीय कमान अधिकारी शेखावत म्हणाले की महिला भगिनींनी आमच्यावर प्रेम दाखवत जो आज सण साजरा केला आहे त्यामुळे आम्हाला डोळ्यात अश्रू आले.देशाच्या व भगिनींच्या रक्षणासाठी आम्ही सदैव तत्पर राहत आहो असे ही ते बोलले.
या कार्यक्रमासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला महिला शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार,पूजा गहिरवार(तालुका सचिव),अनिता कांबळे(शहर सदस्य),प्रमिला नामेवार,अमृता वसाखे,सपना मोहूर्ले,शारदा चिमटपवार,भारती शेंडे,काजल बैस,गुरालवार ताई,कविता सोनुले,शोभा बोरुले,अंजु गुरनुले,रंजना मडावी .ममता पटवर्धन यांच्या सह इतर महिला सदस्या उपस्थित होत्या