आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय उद्धाटन सोहळा संपन्न
- आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय उद्धाटन सोहळा संपन्न
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.-९८६९८६०५३०
मुंबई : -३ जानेवारी २०२० रोजी लोकसत्ताक स्टडी सेंटरचे उद्धाटन सोहळा पार साजरा पडला.लोकशाहीच्या चार स्तंभा वरील सर्व सामान्य स्थरातील विद्यार्थी युवक-युवती पोहचाव्यात या उद्देशाने प्रेरित होऊन कामाला सुरुवात झाली.आणि लॉकडाऊन अचानक लागल्यामुळे आखलेले सर्व नियोजन बारळगले लॉकडाऊन मुळे अनेक अडथळे समस्या निर्माण झाल्या या सर्वावर मात करीत अनेक उपक्रम २०२० व २०२१ मध्ये राबविले गेले. तसेच न थांबता न थकता सतत संघटना कार्यशील राहिली.
सदर उपक्रमाची दखल घेऊन ONGC याद्वारे सहकार्याचा हात पुढे आला. आणि आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय अपडेट करण्याचा संकल्प पूर्तीस नेण्याचा ठरवले.ONGC च्या सहकार्याने ग्रंथालयात UPSC,MPSC स्पर्धा परीक्षेची पुस्तके व कपाटे आज मात्र उपलब्ध झाली.
लोकसत्ताक स्टडी सेंटर येथे मोफत पुस्तके वाचनालययाच्या माध्यमातून भारतात सामाजिक बांधिलकी जपून चांगले अधिकारी बनावे,विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयावर पुस्तके उपलब्ध करून मोफत “लोकसत्ताक स्टडी सेंटर” अनेक ठिकाणी निर्माण होण्यासाठी संकल्पना करून जनमानसात रुजविण्यासाठी आधुनिक भारताचे शिल्पकार संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातून साक्षर समाज व विद्यार्थी घढावे आणि संविधानाच्या चार ही स्तंभावर प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रामाणिक प्रयत्नकरून कर्तव्य अधिकारी म्हणून समाजाची सेवा करावी.
लोक हितकारिणी संस्थेच्या वतीने प्रथमच भव्य असे “लोकसत्ताक स्टडी सेंटर” मुंबई या ठिकाणी निर्माण करण्यात यावी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचा उद्धाटन सोहळा दिनांक २३/०८/२०२१ राजी सायंकाळी ठिक.५:०० वाजता लोकसत्ताक स्टडी सेंटर येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्धाटन मान्यवर मा.श्री.जागेश सोमकुवर GM(P)अध्यक्षAISCSTEWA ONGC MUMBAI, यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मा.श्री.सुनिल सिंह (GGM-HRO), मा.श्री.रघुनाथ कारगांवकर GM (Geo) सेक्रेटरी AISCSTEWA, मा.श्री. विवेक के.झिने DGM (HR) RLO for SC/ST,मा.श्री.आर के. शर्मा CM(F&A),मा.सौ.लता Executive Member,मा.श्री.नरेश घावरी CEC Memberयांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच संस्था,संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मा.अमोलकुमार बोधिराज, वैभव मोहिते, विशाल गायकवाड, दिवाकर कदम,संदिप आग्रे, दिपिका आग्रे,मनिष जाधव,मंदा मोरे,सुप्रिया जाधव,ऍड दिपाली खळे,सुषमा सावंत,सुषमा कांबळे,सनी कांबळे, मंगेश खरात,दिनेश मोरे,पिलाजी कांबळे,मितेश वळंजू,प्रेमसागर बागडे,नरेश कांबळे,मयुरेश जंगम,कमलेश मोहिते,श्रेयश जाधव,दिनेश बोधिराज,रोहित कांबळे,जय खळे,गुणवंत कांबळे यांचा विशेष उपस्थितीत सहभागी होते.