यवतमाळ, येथे सुनेने केला सासऱ्याचा छळ, कंटाळून सासर्‍याने केली आत्महत्या.

यवतमाळ, येथे सुनेने केला सासऱ्याचा छळ, कंटाळून सासर्‍याने केली आत्महत्या.

यवतमाळ, येथे सुनेने केला सासऱ्याचा छळ, कंटाळून सासर्‍याने केली आत्महत्या.
यवतमाळ, येथे सुनेने केला सासऱ्याचा छळ, कंटाळून सासर्‍याने केली आत्महत्या.

✒साहिल महाजन✒
यवतमाळ प्रतिनिधी 9309747836

यवतमाळ:- यवतमाळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता पर्यंत आयकण्यात येत होते की, सासरच्या मंडळाकडून सुनेचा छळ करण्यात येत आहे. पण यवतमाळ मध्ये सुनेकडुन सासर्‍याच्या छळ करण्यात येत होता. या त्रासातून सासर्‍याने एक खळबळजनक पाऊल उचलले.

सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून यवतमाळमध्ये सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना यवतमाळमधील लोहारा एमआयडीसी परिसरातील स्वराज ट्रॅक्टर वर्कशॉप येथे घडली. मृत्यूपूर्वी सासऱ्याने एक चिट्ठी लिहिली होती. या चिठ्ठीतून हा प्रकार उघडकीस आला. साहेबराव दवणे वय 65 वर्ष राहणार पंचशील नगर लोहारा असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

साहेबराव दवणे हे आपला मुलगा सून हिच्या बरोबर एकत्र राहत होते. ते एका ट्रॅक्टर वर्कशॉपमध्ये चौकीदारी करत होते. त्यांनी 4 बचतगटाचे कर्ज उचलून मुलगा सूरजचा विवाह नांदेड येथील संध्या हिच्याशी लावून दिला. संध्या लग्नानंतर नवीन सून बनून घरात आली. मात्र त्यानंतर तिने वृद्ध सासऱ्याला घालून पाडून बोलण्यास सुरुवात केली. लग्नासाठी काढलेला कर्जाचा हप्ता नवऱ्याने भरू नये यासाठी नवऱ्यावर दबाव टाकत होती.
सुनेकडून सासऱ्याला अश्लील शिवीगाळ करत जेलमध्ये टाकण्याची धमकी
सून संध्या सासऱ्याला अश्लील शिवीगाळ करत जेलमध्ये टाकण्याची धमकी देत होती. यामुळे साहेबराव दवणे यांना मानसिक धक्का बसला. या धक्क्यातूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी चिट्ठी खिशात लिहून ठेवली. या चिट्ठीवरून त्यांचा मुलगा सुरज साहेबराव दवणे याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी संध्या सूरज दवणे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.