जीवतीच्या हल्लेखोरांना कडक शासन झालेच पाहिजे- आम आदमी पार्टी चंद्रपुर*

*जीवतीच्या हल्लेखोरांना कडक शासन झालेच पाहिजे- आम आदमी पार्टी चंद्रपुर*

जीवतीच्या हल्लेखोरांना कडक शासन झालेच पाहिजे- आम आदमी पार्टी चंद्रपुर*
जीवतीच्या हल्लेखोरांना कडक शासन झालेच पाहिजे- आम आदमी पार्टी चंद्रपुर*

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045

चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती हे गाव आदिवासी बहुल परिसर. याच गावातील वणी परिसरात श्रीयुत हुके आणि श्रीयुत कांबळे परिवार राहतात.मागील काही दिवसापासून गावातील काही लोकांचा हुके आणि कांबळे परिवार हे गावातील लोकांना जादूटोणा,भानामती करतात असा गैरसमज होता. आणि याच गैरसमजुतीतुन ,अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन याच गावातील जवळपास १०-१५ लोकांनी जमाव तयार करून श्री हुके व श्री कांबळे यांच्या परिवारातील सदस्यांना गावातील चौकात पकडून आणून ,खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यात या दोन्ही परिवारातील ७-८ लोकांना जबर मारहाण झाल्याने त्यांना चंद्रपुर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
भानामती जादूटोणा ,अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालत असून सुद्धा महाराष्ट्रातील अनेक भागात असे प्रकार राजरोसपणे चालू आहेत.
महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेला असतांना सुद्धा अशा घटना घडाव्यात ही येथील शासन,प्रशासनाला अत्यंत शरमेची बाब आहे.
आणि म्हणूनच ज्या लोकांनी अंधश्रद्धा पाळून आपल्याच गाव बांधवावर अमानुष पणे हल्ला करून त्यांना यमसदनी पाठविण्याचा कट केला त्यांना कडक शासन झालेच पाहिजे. असा आम आदमी पक्षाचा समज आहे. जेणे करून समाजात अंधश्रद्धा पाळणार्यांना व भानामती जादूटोणा च्या मागे लागून आपले व आपल्या परिवारातील सदस्यांचे जीवन धोक्यात टाकणे कसे महागात पडते हे समजेल… म्हणून आम आदमी पार्टी चंद्रपुर व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज दिनांक २४ ऑगस्ट २०२१ ला “चंद्रपुर पोलीस अधीक्षक चंद्रपुर ” यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी आम आदमी पक्षाचे इंचार्ज तथा संघटनमंत्री व अंनिस चे शहर अध्यक्ष श्री सुनील रत्नाकर भोयर,सहसंयोजक श्री योगेश आपटे, सचिव श्री राजू कुडे, सहसचिव अजयभाऊ डुकरे,कोशाध्यक्ष श्री अशोक आनंदे, सहसंयोजक सिकंदर सांगोरे, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष श्री जाधव साहेब,सचिव श्री कोंडेकर,आप बाबुपेठ प्रभाग संयोजक श्री थुल साहेब,आप युथ विंग संयोजक श्री मयूर राईकवर इत्यादींची उपस्थिती होती असे सुनील रत्नाकर भोयर यांनी कळविले आहे.