हिंगणघाट येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या सम्प मागे

हिंगणघाट येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या सम्प मागे

हिंगणघाट येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या सम्प मागे
हिंगणघाट येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या सम्प मागे

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट २४/०८/२१
नगरपालिका सफाई कामगारांच्या कामबंद आन्दोलनप्रकरणी काल दुपारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या दालनात बैठक झाल्यानंतर आज स्थानिक पातळीवर बैठक घेऊन तोडगा काढण्यात आला. पालिका मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी सफाई कामगारांच्या लवकरच मान्य करण्यात येईल,असे आश्वासन दिल्याने सफाई कामगार संघटनेने संप मागे घेण्यात आल्याची माहिती रोहित बक्षी यांनी दिली.
काल झालेल्या बैठकीच्यावेळी हिंगणघाट पालिकेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी,आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे,सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष जयसिंग कछवाहा तसेच जिल्हाध्यक्ष मानसिंग झझोटे माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, नगरसेवक सुनील डोंगरे इत्यादि मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्यावेळी आमदार दादाराव केचे यांनी सफाई कामगारांच्या मागण्या जिल्हाधिकारी देशभ्रतार यांच्या पुढे मांडून तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली होती.