शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

✒संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
सांगली :- केंद्र सरकारच्यावतीने अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे, तरी अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
कोरोना वायरस मुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि इतर गोष्टीत विद्यार्थ्यांना खुप मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.