राजकीय ब्रेकिंग न्यूज” गोंडपीपरी महेंद्रसिंग चंदेल यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

“*राजकीय ब्रेकिंग न्यूज” गोंडपीपरी महेंद्रसिंग चंदेल यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

राजकीय ब्रेकिंग न्यूज" गोंडपीपरी महेंद्रसिंग चंदेल यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
राजकीय ब्रेकिंग न्यूज” गोंडपीपरी महेंद्रसिंग चंदेल यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे
गोंडपिपरीचा राजकारणात सर्वदुर परिचित,तेवढाच सन्मान प्राप्त नेता कोण ? असा प्रश्न विचारल्यास उत्तर देतांना जरा गोंधळाचीच स्थिती निर्माण होईल.जसे राजूरा,चिमुर,ब्रम्हपुरी,वरोरा या तालुक्यांची नावे येताच तेथिल नेत्यांचे नाव हमखास तोंडावर येते…ऐवढी त्यांची लोकप्रियता आणि त्यांचे कार्य आहे.

गोंडपिपरी तालुक्यात नेत्यांची कमतरता नाही.मात्र या नेत्यांना ” ती ” उंची गाठता आली नाही.व्हाट्सअपवर राष्ट्रीय चर्चा करणाऱ्या या नेत्यांना तालुक्यातील समस्येवर भाष्य करण्याचे आत्मिक बळ अजून प्राप्त झाले नाही , ही शोकांतिका…!

गोंडपिपरी शहरात नगर पंचायतीचा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.प्रत्येक पक्षातील नेते,कार्यकर्ते समाजमाध्यमात सक्रिय झालेले दिसत आहेत.वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांची ” तु तु मै मै ” रंगु लागली आहे.अश्यात गोंडपिपरी येथिल व्यावसायिक महेंद्रसिंग चंदेल यांची सक्रियता वाढली होती.विविध सार्वजनिक कार्यक्रम तथा सामाजिक कार्यात ते दिसू लागले होते.अश्यात मंगळवारला चंदेल यांनी हाताला घळी बांधली , असे वृत्त तालुक्यात धडकले.चंदेल यांच्या राजकीय ऐंन्ट्रीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यात बांधणी आधीपासूनच तयार आहे.तालुक्यातील अनेक गावात राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रामाणिक असलेले कार्यकर्ते अनेक वर्षापासून सक्रीय आहेत.सक्रिय कार्यकर्त्यांची सक्षम फळी चंदेल यांना आयती गवसली आहे.याचा वापर चंदेल कसे करतात ? यावर बरेच काही अवलंबून आहे.