गांधी जयंतीला, गांधी जिल्हात, चिमुकली वर अत्याचार.

वर्धा :– जिल्हातील पुलगाव येथील पोलिस स्टेशनअंतर्गत येणा-या गावात चॉकलेटचे आमिष दाखवून चीमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 2 अक्टूबर गांधी जयंती, गांधी जयंती ला, गांधी जिल्हात चिमुकली वर अत्याचार झाल्या मुळे सर्व जिल्हातुन संतापजनक प्रतिक्रिया येत आहे.
चिमुकली आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. ती चिमुकली एकटी असल्याची संधी बघुन 40 वर्षीय इसाम तिथे आला. तो त्या चिमुकलीला चॉकलेट घेऊन देतो, असे आमिष दिले, आणी तीला स्वताः च्या घरी घेऊन गेला. पण ही सर्व घटना घरा शेजारी राहणारी एक बाई बघत होती, आणी ही बाब त्या महिलेने चिमुकलीच्या आजोबांना सांगीतली. चिमुकलीचे आजोबा लगेच आरोपीच्या घरी गेले असता दरवाजा आतुन लाऊन होता. दरवाजा ठोकण्यात आला असता आरोपी ने दरवाजा उघडला असता खुप घाबरलेल्या स्थितीत रडत रडत चिमुकली बाहेर निघाली. आणी आरोपीच्या घरा समोर लोकांची गर्दी जमा झाली. तिथे जमलेल्या गर्दीतील लोकांनी त्या नराधाम आरोपिला चांगला चोप दिला. आणी पुलगाव पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती देण्यात आली.
पुलगाव पोलिस स्टेशनला माहिती मिळताच, घटनेची गंभीरता बघुन आरोपीवर भादंवि 376 आणी पास्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुलगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक यांनी गावला भेट देत शांततेच आव्हान केल आणी आरोपीला त्यांने केलेल्या कृत्या बद्दल कठोर शिक्षा होण्यासाठी उप विभागिय पोलिस अधिकारी या घटनेचा तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here