खड्यांविरोधत शहर काँग्रेसच्या भजन अंदोलन

खड्यांविरोधत शहर काँग्रेसच्या भजन अंदोलन

खड्यांविरोधत शहर काँग्रेसच्या भजन अंदोलन
खड्यांविरोधत शहर काँग्रेसच्या भजन अंदोलन

संदीप तूरक्याल

चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045

बाबुपेठ ते अंकलेश्वर गेट या रस्त्यावरचे दुरवस्था झाली आहे चंद्रपुरात गड्डे आहे की गड्या चंद्रपूर आहे अशी परिस्थिती निर्माण करणारे महानगरपालिका च्या विरोधात आंदोलन करण्यात आला..
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, विकासाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप पदाधिका-याचे जनतेच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सत्ताधा-यांनी शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा खुर्ची खाली करावी, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे.चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्त्यातील खड्डयांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत झोपेचे सोंग घेऊन असलेल्या मनपातील भाजप सत्ताधिका-यांना जागे करण्यासाठी मंगळवारी (ता.२४) बागला चौकात भजन आंदोलन करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद जी दत्तात्रय व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनपाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. भजन मंडळी आणि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भजन सादर करीत निषेध नोंदविला.
यावेळी कांग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.