वंचित घटकांना सोबत घेवुन येणारी काटोल नगर परिषदेची निवडणूक लढवनार: दिगांबर डोंगरे
=== मुख्य मुद्दे ===
● पेठबुधवार येथे वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक समीक्षा आढावा बैठक संपन्न.
●ईतर मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी घेतला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश.
● धनगर समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवीदासजी घायवट यांची पक्षाच्या काटोल तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
● पेठबुधवार येथील भोई समाजाचे सामाजिक कार्यकर्ते डॉ सुधाकर कावळे यांची काटोल शहराच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
काटोल/नागपुर:- वंचित बहुजन आघाडीची काटोल शहर व तालुक्याची संघटनात्मक समीक्षा बैठक व पक्ष प्रवेश बैढक पक्षाचे नेते दिगांबर डोंगरे यांच्या घरी पेठबुधवार येथे आयोजित करण्यात आली होती.
या महत्वपुर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विलास वाटकर तर प्रमुख उपस्थितीत पक्षाचे जिल्हा महासचिव अजय सहारे, जिल्ह्याचे महासचिव तथा नगर पालिका काटोलचे माजी सभापती दिगांबर डोंगरे, जिल्हा प्रवक्ता सुमेध गोंडाने, जिल्हा सचिव दिपक डोंगरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
समोर होवु घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुका पुर्ण ताकतीने लढणार असलेले पक्षाचे उमेदवार येनवा जिल्हा परिषद सर्कल सिद्धार्थ कुकडे, पारडसिंगा जिल्हा परिषद सर्कलच्या सुजाता डबरासे, भिष्नुर जिल्हा परिषद सर्कलचे सुनिल नारनवरे यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यात आला.
यावेळेस जय मल्हार सेनेचे जिल्ह्याचे नेते काटोल तालुक्याचे ज्येष्ठ सामाजिक देविदास घायवट, डॉ. सुधाकर कावळे, बहुजन समाज पक्षाचे रामराव पाटील, ओंकार मलवे, भगवानजी मून, प्रा. परिक्षित कुमार, राजेंद्र बागडे (पेंटर), यशवंत धाडसे, गुलाबराव तागडे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात पक्षात प्रवेश केला.
त्यानंतर काटोल तालुक्याचे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये काटोल तालुक्याच्या अध्यक्षपदी धनगर समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक देवीदासजी घायवट यांची निवड करण्यात आली. तर यशवंत धाडसे प्रकाश निस्वादे यांची उपाध्यक्ष पदी तर राजू सहारे यांची व रूपेश बोरकर यांची महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली. तर काटोल शहराच्या अध्यक्षपदी पेठबुधवार येथील भोई समाजाचे ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते डॉ. सुधाकर कावळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सुरेश देशभ्रतार यांची उपाध्यक्षपदी तर प्रा. परिक्षित कुमार यांची महासचिव पदावर तर ओंकार मलवे यांची सचिव पदी निवड करण्यात आली. सेवानिव्रूत्त कर्मचारी सल्लागार समितीच्या काटोल तालुका अध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ नेते जानराव गावंडे तर रामराव पाटील, गुलाबराव तागडे यांची उपाध्यक्ष पदी नीवड करण्यात आली.
पारडसिंगा जील्हा परिषद सर्कलच्या अध्यक्षपदी दिनेश तायडे तर निरीक्षक पदी रामराव पाटील व नितीन तायवाडे यांची निवड करण्यात आली. तर येनवा जील्हा परिषद सर्कलच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ कुकडे यांची तर निरीक्षक पदी प्रकाश निस्वादे, व बाबाराव गोंडाने यांची निवड करण्यात आली तर मेटपान्जरा जी.प. निरीक्षक पदी सतिश पाटील व श्रीकांत गौरखेडे यांची निवड करण्यात आली.
यावेळेस प्रास्ताविक करत पक्षाची भुमिका विशद करताना दिगांबर डोंगरे यांनी सांगितले की आंबेडकरी मताची आजपर्यंत कोणत्याही पक्षाने इज्जत केली नाही की नेत्रुत्व तयार केल नाही. फक्त व्होट बैंक म्हणून दलित, आदिवासी, मुस्लिम समुदायाचा वापर केला समाजाचे मत चालतात पण मानस चालत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून राजकीय सामाजिक आर्थिक विकासापासून हा समुदाय वंचित राहलेला आहे. तेव्हा पुढील काळात स्वता:हाची व्होट बैंक तयार करण्याची जबाबदारी दलित, आदिवासी, मुस्लिम समाजानी पार पाढण्याकरिता तयार व्हावे असे सांगताना पुढे म्हणाले की येणारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पहिल्यांदाच आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या आहेत.
पुढील काळात काटोल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होवु घातलेल्या आहेत या निवडणुकीत सर्व वंचित घटकांना सोबत घेवुन पूर्ण ताकदनीशी निवडणुका लढवून प्रस्तापिताच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी बिगूल फूकनार असे दिगांबर डोंगरे यांनी सांगितले. तर जिल्हाध्यक्ष विलास वाटकर, महासचिव अजय सहारे, प्रवक्ता सुमेध गोंडाने, जिल्हा सचिव दिपक डोंगरे, देविदासजी घायवट, रामरावजी पाटील, सुधाकर कावळे, सुरेश देशभ्रतार, यांनीही पक्ष संघटनेविषयी मार्गदर्शन केले.
या बैठकीला जानराव गजभिये, सतिश पाटील, दिनेश तायडे, दिगांबरराव भगत, पवन सोनवणे, राजू सहारे, यशवंत धाडसे, रूपेश बोरकर, विनायक ढोणे, सिद्धार्थ कुकडे, बाबाराव गोडाने, प्रा.परिक्षित कुमार, गुलाबराव तागडे, राजेंद्र बागडे, ओंकार मलवे, सुनिल परतेती, गौरव पाटील, समीर बन्सोड, देवराव हिवरकर, अमित तागडे, जगदीश पाटील, भगवान मून, श्रीकृष्ण ढोके, कृष्णाजी काळभांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.