पूरग्रस्त सादृश, नैसर्गिक आपत्तीचा निचरा करणाऱ्या कामगारांचा गौरव कार्यक्रम”

पूरग्रस्त सादृश, नैसर्गिक आपत्तीचा निचरा करणाऱ्या कामगारांचा गौरव कार्यक्रम”

पूरग्रस्त सादृश, नैसर्गिक आपत्तीचा निचरा करणाऱ्या कामगारांचा गौरव कार्यक्रम”
पूरग्रस्त सादृश, नैसर्गिक आपत्तीचा निचरा करणाऱ्या कामगारांचा गौरव कार्यक्रम”

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई :-महाड,खेड, चिपळूण, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पूरग्रस्त, भूस्खलन घरांची पडझड, गावचे गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले.अशा परिस्थितीचा निचरा करण्यासाठी रवाना झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक,कंट्रोल रूम कामगार आणि वाहनचालक व कामगार यांचा ‘पूरग्रस्त कामगार योद्धा’ म्हणून गौरव कार्यक्रम ‘मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या’ वतीने अध्यक्ष मा.ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई.४०००१४ येथे पार पडला.

सदर कार्यक्रम प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मा.भिमरावजी आंबेडकर प्रमुख पाहुणे व प्रमुख अतिथी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील माजी सहाय्यक आयुक्त मा.किशोरजी देसाई उपस्थित होते.त्यांच्या हस्ते सन्मानपत्र, पूरग्रस्त कामगार योध्दा मेडल,पुष्पगुच्छ देऊन अधिकारी, परिवहनखाते व २४ वॉर्डातील कर्तव्य बजावलेल्यांचा सन्मान करण्यात आला.संबोधित करताना प्रमुख पाहुणे या नात्याने मा.भीमरावजी आंबेडकर म्हणाले की, आपत्कालीन, पूरग्रस्त परिस्थिती, भूकंप अशावेळी जे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कामगार जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता कर्तव्य बजावतात.त्यांना १ महिन्याचा पगार अतिरिक्त देऊन सन्मान केला पाहिजे, अशी मागणी केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त मा.किशोरजी देसाई यांनी आपल्या भाषणात म्हटले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्थापित केलेली ‘मुंबई म्युनिसिपल कामगार संघ’ ही १९३७ साली स्थापन झालेली संघटना आहे. या संघटनेने घेतलेल्या कर्तव्य बजावलेल्या कामगारांचा गौरव सोहळा स्तुत्य कार्यक्रम मनाला आनंदमय वाटला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न व कार्य या माध्यमातून कामगारांना दिलासा मिळावा व ते कार्य चालू ठेवावे, असे समायोजन मार्गदर्शन केले.
’मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे’ सरचिटणीस मा.संजीवन पवार यांनी विस्तृत चर्चा करताना सांगितले की, आपत्कालीन परिस्थिती उद्भवते अशावेळी कामगार त्याठिकाणी जातो.त्यांच्याबरोबर कंबळ, चादर,पेस्ट,साबण या प्राथमिक सुविधांची सोय करणे जरुरीचे आहे.सोबत त्यांचा सन्मानही व्हावा, वैद्यकिय तपासणी होणे गरजेचे आहे व त्याबरोबर १ पगार बक्षिस म्हणून द्यावा, असे संबोधित करून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (प.उ) यांचेकडे मागणीपत्र दिलेले आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिटणीस श्री.दिपक जाधव व श्री.शैलेश कदम यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शनाचे काम श्री.मिलिंद सावंत यांनी केले व अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. अशी माहिती कार्यालयीन सचिव श्री.रूपेश देसाई यांनी दिली आहे.