राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे विमलबाई कुवर यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन

शहादा प्रतिनिधी – राहुल आगळे
शहादा –दिनांक २६/०८/२०२१ रोजी मा.डी.वाय.एस.पी.सो.शहादायांना श्री विमलबाई परबत कुवर रा.डोंगरगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांनी विनंती पूर्वक अर्ज दाखल केला होता.त्या अर्जात म्हटले आहे, की मी वयोवृद्ध महिला आहे माझ्या नावावर मौजे डोंगरगाव तालुका शहादा ग्रामपंचायत हद्दीतील घर नंबर ६६९. क्षेत्रफळ १७×११=१८७ चौ.फुट पंतप्रधान आवास योजना घरकुल मिळत असून सन २०१६-२०१७ या वर्षी हे मंजूर घरकुल बांधकाम केले आहे. या घरात संशयित प्रियंका राजेंद्र ठाकरे व तिची आजी आशाबाई नरसी पाडवी हे जानेवारी २०१८ पासून ते आजमिती पावेतो राहत आहेत.
सदर घर मी स्वखुषीने माझे नात्यातील मुलीचा मुलगा नामे राजेंद्र भरत ठाकरे यास नातू या नातेसंबंधामुळे केवळ तात्पुरते राहण्यासाठी दिले आहे. यानंतर काही दिवस तो सहपरिवार राहत असताना पती-पत्नीचे दरम्यान आपसात मतभेद झाले म्हणून तो माझा नातू त्याच्या आई वडिलांकडे राहण्यास निघून गेला असून आता तो गावातच आई बापाकडे राहत आहे. दरम्यान संशयित प्रियंका राजेंद्र ठाकरे हिने मे शहादा न्यायालयात दावा दाखल केला आहे. हा दावा सासरच्या मंडळी विरोधात आहे माझ्या काही संबंध नाही.
वरील संशयित पैकी प्रियंका राजेंद्र ठाकरे ही पती पासून विभक्त राहते मात्र माझ्या मालकीच्या घरातच तिने व तिच्या आजीने कब्जा करून ठाण मांडले आहे सदर माझे घर खाली करून द्यावे म्हणून संशयित महिलांना सांगितले असता ते अरेरावी करतात व धमकावतात संशयित यापैकी प्रियंका राजेंद्र ठाकरे तिचे वडील नामे सुनील नरसी पाडवी हे पोलिस कर्मचारी असून सध्या प्रकाशा औट पोस्ट (तालुका शहादा) येथे नेमणुकीस असल्याने मला धमकावते.तरी मी वृद्ध महिला आहे. शासनाने बांधून दिलेल्या माझ्या मालकीच्या घरातच काहीही हितसंबंध नसतांना संशयित १) प्रियंका राजेंद्र ठाकरे २) आशाबाई नरसी पाडवी यांनी अनाधिकारे कब्जा केला आहे. तरी त्यांनी माझे घर तात्काळ खाली करून माझ्या ताब्यात द्यावे म्हणून उचित कारवाई करून संशयितांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी मी अर्ज केला होता.
त्या वर काहीही कारवाई झाली नाही.
त्या साठी श्रीमती दिपांजली ताई गावित यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनाही दि.२५/०८/२०२१ रोजी याच समस्ये करिता पत्र दिले आहे व राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे न्याय मिळवून देण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे.संशयीतांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा सोबत नमुना नंबर ८ उतारा जोडला आहे.