कोल्हापुर सात वर्षांच्या दत्तक मुलीसह आईची नदीत उडी घेऊन आत्महत्या.

✒MVN क्राईम रिपोर्टर✒
कोल्हापूर :- कोल्हापुर येथून एक मन हेलवणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोल्हापुर येथीन एका सात वर्षांच्या चिमुकलीसह आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. वारणा नदीत उडी घेऊन महिलेने मुलीसह आयुष्य संपवलं. दत्तक घेतलेली मुलगी गतिमंद असल्याच्या नैराश्येतून आईने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कोल्हापुरातीस कोडोली – चिकुर्डे धरण पुलावरुन महिलेने मुलीसह नदीत उडी घेतल्याचा आरोप आहे. आई आणि मुलगी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीच्या रहिवासी होत्या. दत्तक घेतलेली मुलगी गतिमंद असल्याच्या नैराश्येतून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे वारणा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिस घटनास्थळी दाखल झाली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.