माजी मंत्राच्या निवासी मतिमंद शाळेची दुरावस्था*
सर्वत्र घाणीचे साम्राज्य

सर्वत्र घाणीचे साम्राज्य
साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी 9309747836 मीडिया वार्ता न्यूज यवतमाळ
उमरखेड : -उमरखेड तालुक्यात उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन उदासीन आहे.
याचाच एक भाग म्हणून उमरखेड शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या ढाणकी रोडवर माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे निवासी मतिमंद विद्यालय आहे,या विद्यालयाची दैनावस्था झाली आहे. शाळेच्या चारही बाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे येथे शिक्षण घ्यावे तरी कसे असा प्रश्न सध्या मतिमंद मुलांच्या पालकांना पडला आहे.
याकडे शाळेचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे हे सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहे.
या शाळेच्या अवतीभोवती मात्र दुर्गंधी पसरलेली असते. विकासाचा आव आणणारे प्रतिनिधी याबाबत अनभिज्ञ असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.शाळेच्या सभोवताली सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे,थोडा जरी पाऊस पडला की शाळेच्या आवारात चिखलाचे साम्राज्य असते,या शाळेत जायला साधा रोड नाही या शाळेत जायला रस्ता तर नाहीच,शाळेत जायचे म्हटले की शेतातून जावं लागतं ही एक शोकांतिका आहे.जो रोड आहे त्यावरचे संपूर्णतः डांबरीकरण उखळून गेलं आहे,जेव्हा मुसळधार पाऊस येतो.
तेव्हा त्या रस्त्यावरून चिखल तुडवीत जावं लागतं,विद्यार्थ्यांना पायी चालणे कठीण होते.त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात नावाने गाजलेले काँग्रेसचे शिवाजीराव मोघे अशी यांच्या शाळेची दुरावस्था आहे.त्यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे जिल्ह्यात विकासाच्या नावावर नागरिकांना आपलं ‘ज्ञान’ पाजत असतात तर दुसरीकडे ही उमरखेड शहरात असलेली मोघे यांची निवासी मतीमंत शाळा विकासाच्या नावांनी अलिप्त आहे.
या शाळेच्या दुरावस्थेवरून असे दिसून येते की मोघे जेवढे मोठे तेवढे खोटे असच की.या शाळेकडे मोघे यांनी साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.शाळेच्या चारही बाजूने शेत आहे आणि मधात ही शाळा वसलेली आहे,पावसामुळे शाळेच्या आवारा मधील पाणी दोन ते तीन दिवस साचून राहते अशी मोघे यांच्या शाळेची अवस्था आहे.त्यामुळे या शाळेची दुरावस्था पाहून शहरवाशी उलट सुलट चर्चा करताना दिसून येत आहे.