जळगावत विधवा महिलेची हत्या, काही तासांनी संशयित पोलिसांच्या ताब्यात

54

जळगावत विधवा महिलेची हत्या, काही तासांनी संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगावत विधवा महिलेची हत्या काही तासांनी संशयित पोलिसांच्या ताब्यात
जळगावत विधवा महिलेची हत्या, काही तासांनी संशयित पोलिसांच्या ताब्यात

विशाल सुरवाडे
जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव,दि.27:- जळगाव शहरातील आज एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीआहे. वंदना गोरख पाटील असे हत्या झालेल्या विधवा महिलेचे नाव आहे. या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालीआहे. या खून प्रकरणाचा तपास लावण्यात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन विभागाला यश आले आहे. काही तासातच लागलेल्या या तपासामुळे पोलिस पथकाने सुस्कारा सोडला आहे.

वंदनाचा पती मयत झाल्यानंतर तिचे सुरेश सुकलाल महाजन याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. सुरेश हा भाजीपाला मार्केटमधे हमालीचे काम करत होता. ती त्याठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी येत होती. दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. संपर्कातून दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. बघता बघता 21 वर्षाचा कालावधी लोटला. दोघांचे प्रेमसंबंध आता जगा समोर आले होते. सुरेश विवाहीत होता. तिचे त्याच्या घरी नेहमी येणे जाणे होते. दोघांचे प्रेमसंबंध त्याच्या घरात त्याची पत्नी व मुलांना माहिती झाले होते. तसेच तिला लागणारा खर्च देखील सुरेश पुर्ण करत होता असे सूत्रांकडून समोर आले आहे.

दरम्यान वंदनाचे कुणाशी तरी प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा सुरेश याला संशय होता. या प्रकाराला त्याचा विरोध होता. तिला कुणाशी तरी फोनवर बोलत असतांना सुरेशने पकडले होते असा सुरेशचा आरोप आहे. मात्र तिने फोनवर बोलणा-याचे नाव त्याला सांगितले नाही. सुरेशने आपल्यासोबत असलेले संबंध संपुष्टात आणावे यासाठी ती त्याच्याशी व्यवस्थीत वागत नव्हती. ती त्याला अतिरिक्त पैशांची मागणी करत होती. गेल्या कित्येक वर्षापासून सुरेश तिचा सर्व खर्च पेलत होता. तसेच त्यांचे संबंध समाजात सर्वांना माहिती होते. असे असतांना तिने अन्य पुरुषासोबत संबंध निर्माण केल्यास आपली सर्वत्र बदनामी होईल या विचाराने सुरेश अस्वस्थ झाला होता. मात्र वंदनाला त्या गोष्टीचे काही देणेघेणे नव्हते. ती सुरेशच्या प्रतिमेला धक्का बसेल याचा विचार करत नव्हती.

या गोष्टीचा राग आल्याने संतापात त्याने मध्यरात्री वंदनाचा खून केला आहे. खूनाची घटना समजताच एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयीत आरोपीचे नाव निष्पन्न केले होते. हा गुन्हा त्यानेच केला असल्याची खात्री झाल्यानंतर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांच्या पथकाने त्याला चोपडा येथून ताब्यात घेतले. चोपडा येथून जवळपास तिन कि.मी.अंतरावर असलेल्या महादेव मंदीरात तो लपून बसला होता. त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

सुरुवातीला त्याने वंदना कोण? मी तिला ओळखत नाही अशी सुरुवात केली. मात्र लवकरच त्याने आपला गुन्हा कबुल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार, राजेंद्र कांडेकर करत आहेत. आरोपीस अटक करण्यात आली आहे.