महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत,
सत्यविजय कामगार संघटनेचा दणदणीत विजय !

सत्यविजय कामगार संघटनेचा दणदणीत विजय !
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104
हिंगणा : -महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत नुकतीच कामगार प्रतिनिधी साठी निवडणूक पार पडली,यात सत्यविजय कामगार संघटनेचा दणदणीत विजय झाला असून संघटनेचे चार प्रतिनिधी निवडून आले तर एक प्रतिनिधी हे भारतीय कामगार सेनेचे निवडणूक आले आहेत पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 28 उमेदवार उभे होते.सत्यविजय कामगार संघटनेचे विनोद अवचट, दयानंद डांगरे, बाबाराव मानकर,प्रमोद पाल हे कामगार प्रतिनिधी निवडून आले तर भारतीय कामगार सेनेचे एकमेव अक्षय साहु हे निवडून आले.या वेळी वानाडोंगरी येथील दादाराव मुडे यांचे घरी एका छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी वानाडोंगरीच्या नगराध्यक्षा वर्षाताई शाहकार यांच्या हस्ते नवनिर्वाचित कामगार प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला या वेळी माजी सरपंच सतिश शाहकार, शिक्षण सभापती वंदनाताई मुडे, नियोजन समितीचे सभापती भागवत काळे, नगरसेवक गुणवंतराव मते, नगरसेविका महानंदा पाटील सामाजिक कार्यकर्ते दादाराव मुडे, सचिन मेंडजोगे,मनोज राऊत इत्यादी उपस्थित होते. सत्कारला उत्तर देताना कामगार प्रतिनिधी म्हणाले की आमचेवर कामगारांनी जो विश्र्वास दाखवला त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही.