हिंगणघात मध्ये गुन्हेगारांचे वर्चस्व, मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीला फावड्याने मारहाण.

हिंगणघात मध्ये गुन्हेगारांचे वर्चस्व, मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीला फावड्याने मारहाण.

हिंगणघात मध्ये गुन्हेगारांचे वर्चस्व, मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीला फावड्याने मारहाण.
हिंगणघात मध्ये गुन्हेगारांचे वर्चस्व, मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीला फावड्याने मारहाण.

मुकेश चौधरी✒
सह संपादक मिडिया वार्ता न्यूज
7507130263
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर आता क्राईमची राजधानी होण्याच्या मार्गावर निघाले असल्याचे चित्र दिसुंन येत आहे. मर्डर, हाफ़ मर्डर, बंदुक चालवने, मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री, गांजा, सट्टा याचा उत आला आहे. पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे की, पोलीसांची शहरात कुठेही दहशत ऊरलेली.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून तर भयानक घटना समोर आली आहे. चार नराधम एका तरुणाला फावड्याने निर्घूणपणे मारहाण करत होते. यावेळी मध्यस्थीसाठी पडलेल्या एका व्यक्तीला आरोपींनी इतक्या अमानुषपणे मारहाण केली की तो जागेवर बेशुद्ध पडला. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. विशेष म्हणजे भर दिवसा, भर रस्त्यात गजबजलेल्या परिसरात ही घटना घडली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.

हिंगणघाट शहरातील बस स्थानक परिसरातील दत्त मंदिरसमोर बुधवारी दि 25 ऑगस्ट सकाळच्या सुमारास संबंधित घटना घडली. आरोपी आदर्श गोलाईत, कुणाल लाजूरकर, सागर यादव, सोनू सोनकुसरे हे चौघे मिळून संदीप नावाच्या तरुणाला मारहाण करत होते. यावेळी वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी गेलेल्या व्यक्तीस चौघांनी लाठ्याकाठ्या तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करीत जखमी केले. ही घटना दत्त मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली आहे.

दिलीप मारोती दानव हे मजुरीच्या कामावर जाण्यासाठी घरुन फावडे, घमिलं घेऊन कामावर जात असताना चौघे जण संदीप नामक युवकाला मारझोड करीत असल्याचे दिसून आले. संदीप ओळखीचा असल्याने दिलीप हे वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी गेले असता आदर्श गोलाईत, कुणाल राजुरकर, सागर यादव, हिमांशु सोनकुसरे यांनी दिलीपला तू मध्ये का आलास? असे म्हणून फावड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. जखमी दिलीप यांच्यावर हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई केली. पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच आरोपींविरोधात कलम 326-34 अंतर्गत हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.