नदीत बुडून 8 आणि 9 वर्षांच्या चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत. परीवारावर कोसळला पहाड.

नदीत बुडून 8 आणि 9 वर्षांच्या चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत. परीवारावर कोसळला पहाड.

नदीत बुडून 8 आणि 9 वर्षांच्या चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत. परीवारावर खोसळला पहाड.
नदीत बुडून 8 आणि 9 वर्षांच्या चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत. परीवारावर खोसळला पहाड.

श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड,दि.28 ऑगस्ट:- बीड येथून एक हृदय हेलावणारी दुर्दैवी बातमी समोर आली आहे. एका घटने मुळे हसतं – खेळतं कुटुंब काही क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. असाच प्रकार बीडमधील कोरडे कुटुंबासोबत घडला आहे. या घरातील दोन चिमुरड्यांच्या किलबिलाटाचा करुण अंत झाल्याची घटना घडली आहे. अवघ्या 8 आणि 9 वर्षांच्या मुलींचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मुली त्यांच्या आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला. कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन याठिकाणी ही घटना घडली. नेहा धर्मराज कोरडे वय 9 वर्ष आणि अमृता धर्मराज कोरडे वय 8 वर्ष अशी या घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले. तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. कोरडे कुटुंबावर ओढावलेल्या या प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.