बल्लारपुर नगर परिषदेला टाटा एज्यूकेशन व डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून 15 बेड, 16 ऑक्सिजन पॉइंट व इतर महत्वपूर्ण उपकरणे सीसीआर निधीच्या माध्यमातून उपकरणे मंजूर
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढकाराना यश

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
बल्लारपूर:- सवित्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की: कोरोनाची तीसरी संभाव्य लाट लक्षात घेता आपल्या मतदार संघातील आरोग्य संस्था आरोग्य सेवेसाठी सज्ज राहव्या या दृष्टीने विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार बल्लारपुर नगर परिषदेला टाटा एज्यूकेशन व डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून माध्यमातून 15 बेड, 16 ऑक्सिजन पॉइंट व इतर महत्वपूर्ण उपकरणे मंजूर करविली आहे. सदरचे साहित्य कळमना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वापरून ऑक्सिजन सुविधायुक्त कोरोना केअर सेंटर तयार करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या दोन्ही लाटे दरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या बल्लारपुर मतदार संघासह सम्पूर्ण चंद्रपुर जिल्ह्यात आरोग्य सुविधा पुरविणयासह सेवाकार्य केले. मास्क , ऑटोमेटिक सैनिटाइजर मशीन , ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटर, रुग्णवाहिका, कोविड केअर सेंटर, पीपीई किट, कोविड रुग्णालय , मोठे व लहान व्हेन्टीलेटर आदिंच्या उपलब्धतेसाठी आ. मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले व यश प्राप्त केले. लॉक डाउनच्या काळात देखील गरीब नागरिकांसाठी भोजन व्यवस्था ,जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वितरण, रुग्णाची ने आण करण्यासाठी रूग्णवाहिकांची सोय, रक्तदान शिबिरे असे विविध माध्यमातून सेवाकार्य करण्याचं काम आ. मुनगंटीवार करीत आहे.