डोरली भांडवलकर येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न.

डोरली भांडवलकर येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न.

डोरली भांडवलकर येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न.
डोरली भांडवलकर येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- येनवा जिल्हा परिषद सर्कलच्या डोरली भांडवलकर गावात वंचित बहुजन आघाडीची बैठक वंचित बहुजन आघाडीचे नागपुर जिल्हा ग्रामीणचे महासचिव तथा नगर पालिका काटोलचे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली तर काटोल तालुका अध्यक्ष देवीदासजी घायवट काटोल शहर अध्यक्ष डॉ. सुधाकर कावळे येनवा जिल्हा परिषद सर्कलचे अध्यक्ष व उमेदवार सिद्धार्थ कुकडे, निरीक्षक प्रकाश निस्वादे, बाबाराव गोंडाने यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळेस महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दिपं प्रज्वलित करून बैठकीची सुरवात करण्यात आली. त्यानतंर पक्ष वाढिचा अहवाल निरीक्षक बाबाराव गोंडाने व प्रकाश निस्वादे यांनी स्वादर केला.

यावेळेस कार्यकर्त्यांनी एक जुटिने काम करून पक्षाच्या गरीब व प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहून प्रस्तापीताना धक्का देत सिद्धार्थ कुकडे यांना विजयी करून येनवा सर्कल मध्ये पहिल्यांदा इतिहास घडवावा व वंचित बहुजन आघाडीच्या झेंडा नागपुर जिल्हा परिषदेवर फडकवावा असे भावनिक आवाहन दिगांबर डोंगरे यांनी केले. यावेळी देवीदासजी घायवट, सुधाकर कावळे, दिपक मेश्राम, जानराव गजभिये, युवराज तागडे, बाबाराव गोंडाने, प्रकाश निस्वादे यांनीही आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ कुकडे यांनी केले संचालन पुणदास निस्वादे यांनी तर आभार.मनोहर शिंदे यांनी मानले.

यावेळेस सुदामजी शिंदे, कैलास मुंदाफडे, माणिकराव सिलगाम, मंगेश सावरकर, ईश्वर चाफले, सुनिल धुर्वे, अतुल धुर्वे, ईश्वर बडोदे, मनोज शिंदे, दयारामजी घोरपडे, गजेंद्र धुर्वे, नितीन शिंदे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व गावातील लोक उपस्थित होते.