वडकी येथील नामांकित डॉक्टर सुरेंद्र ठमके यांची वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या.

वडकी येथील नामांकित डॉक्टर सुरेंद्र ठमके यांची वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या.

वडकी येथील नामांकित डाक्टर सुरेंद्र ठमके यांची वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या.
वडकी येथील नामांकित डाक्टर सुरेंद्र ठमके यांची वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या.

साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यु-9309747836
राळेगाव:- तालुक्यातील वडकी येथील प्रतिष्ठित नागरिक तथा एसकेज हॉस्पिटलचे मालक डॉक्टर सुरेंद्र ठमके यांनी कारेगाव नजिक असलेल्या वर्धा नदीच्या पुलावरून उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना आज दिनांक २९ आगस्ट ला दुपारी १ वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती गावात पसरताच शेकडो नागरिकांनी पुलावर गर्दी केली होती.

डॉ. ठमके यांनी १०० फूट उंचीवरून नदीच्या पात्रात उडी घेतली. पुलाजवळ त्यांची टू व्हीलर. चप्पल आणि इतर साहित्य आढळून आले त्यामुळे पोलिसांना प्राचारन करून नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला असता सुमारे दोन ते तीन तासांनी त्यांचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. वडकी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून घटनास्थळी पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राळेगाव येथे पाठवून दिला. वृत्तलीहीपर्यंत त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. डॉ. ठमके यांचे आत्महत्तेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.