भूखंड विक्रीमध्ये गैरव्यवहार रक्कम घेतली, भूखंडाचे विक्रीपत्र करून दिले नाही.

✒युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर:- आज नागपुर जिल्हा भूखंड विक्रीचे गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात अनेक नागरिकाची लूट होत असल्याची माहिती समोर येत आहे. अशीच एक बातमी समोर आली आहे. भूखंडाचा साैदा केल्यानंतर 70% टक्के रक्कम घेऊनही एका आरोपी बिल्डरने 9 वर्षे होऊनही भूखंडाचे रीतसर विक्रीपत्र करून दिले नाही. त्यामुळे कपिलनगर पोलिसांनी 21 आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
नागपुर येथील कपिलनगर राहणा-या सुरेश फुलचंद विश्वकर्मा वय 49 वर्ष असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी 18 जून 2012 ला सर्वोदय सहकारी संस्था, मर्यादित माैजा नारी, रमाईनगरच्या पदाधिकाऱ्यांकडून 4.50 लाखात एक भूखंड विकत घेण्याचा साैदा केला होता. त्यापोटी त्यांना 3.50 लाख रुपये नगदी स्वरूपात दिले होते. उर्वरित रक्कम विक्रीपत्र करून देतेवेळी देण्याचे ठरले होते. पण आता त्याला 9 वर्षे उलटूनही आरोपींनी बिल्डरने विश्वकर्मा यांना विक्रीपत्र करून दिले नाही. आरोपी सारखी टाळाटाळ करत असल्यामुळे विश्वकर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चाैकशीअंती शुक्रवारी खालील आरोपींविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
नागपुर येथील ज्या आरोपी बिल्डर ने तक्रारकर्त्या ला विक्रीपत्र करुन दिले नाही त्याची नाव अंजनाबाई रूपचंद मोटघरे, विजय रूपचंद मोटघरे, सविता राजेश मोटघरे, अभिषेक राजेश मोटघरे, शिवानी राजेश मोटघरे, जोस्त्ना येमराज
वासनिक, स्मिता राजेश तांबे, सुषमा जयकुमार मेश्राम, अलका मनोहर वंजारी, (सर्व राह. हरीदास नगर, लष्करीबाग), जितू लीलाधर मोटघरे, महेद्र लीलाधर मोटघरे, मीना प्रकाश चव्हाण (रा. कबीर नगर), साधना निलकंठ मोटघरे, शुभम निलकंठ मोटघरे, सोनम अजय नितनवरे, मीनल निलकठ मोटघरे (सर्व रा. वैशालीनगर), शिला गणेश मोटघरे, शक्ती गणेश मोटघरे, स्वप्नील गणेश मोटघरे (रा. संत्रा मार्केट रोड, कुंभारपुरा, बजेरीया), आशा ईश्वर मोटघरे आणि अंकीता ईश्वर मोटघरे (रा. हिंगणा मार्ग), अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.