फॉगींग बाबत जाब विचारायला आम आदमी पार्टी धडकले स्वच्छ्ता निरीक्षक यांच्या कार्यालयात

फॉगींग बाबत जाब विचारायला आम आदमी पार्टी धडकले स्वच्छ्ता निरीक्षक यांच्या कार्यालयात

फॉगींग बाबत जाब विचारायला आम आदमी पार्टी धडकले स्वच्छ्ता निरीक्षक यांच्या कार्यालयात*
फॉगींग बाबत जाब विचारायला आम आदमी पार्टी धडकले स्वच्छ्ता निरीक्षक यांच्या कार्यालयात

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
Mob… 9834024045

चंद्रपूर:- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतांना शहरात डेंग्यू आजाराने थैमान घातले असून शहरातील दवाखाण्यात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पालिका प्रशासन या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करीत नसून फक्त दुर्लक्ष करत आहे. जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग, हिवताप अधिकारी यांचे सुद्धा दुर्लक्ष आहे. यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे ऑक्टोबर- नोव्हेंबर या महिन्यात डेंग्यू डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच मलेरिया, हिवताप तसेच इतर संसर्गजन्य आजारांनी धुमाकुळ घातला आहे.

सद्या शहरात डेंग्यू या आजाराने थैमान घातले असून यात बाबुपेठ सुध्दा अछुत राहिलेला नाही. दिवसेदिवस बाबुपेठ मध्ये डेंग्यू रूग्ण वाढत आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करून दाट झोपेत असल्याचे चित्र बाबुपेठ मध्ये दिसत आहे. काही नागरिकांनी आमच्या वॉर्डात फाँगिंग होत नसल्याची तक्रार आम आदमी पार्टी कडे केली.

या संदर्भात जाब विचारण्याकरिता येथील स्वच्छ्ता निरीक्षक ढवळे यांना आम आदमी पार्टी बाबुपेठचे शिष्ट मंडळांनी भेट देऊन या बाबत विचारणा केली . यावेळेला बाबुपेठ प्रभाग चे महिला संयोजिका श्रीमती सुजाता बोदेले, प्रभाग संयोजक जयंत थूल, प्रभाग सहयोजक निखिल बरसागडे, प्रभाग संघटक चंदू मांदुरवार, महानगर सचिव राजू कुळे बाला खैरे, महेश गुप्ता इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.