अमोल कोल्हे यांनी आपले सरकार केंद्रांबाबत केलेल्या मागणीला यश

54

अमोल कोल्हे यांनी आपले सरकार केंद्रांबाबत केलेल्या मागणीला यश

अमोल कोल्हे यांनी आपले सरकार केंद्रांबाबत केलेल्या मागणीला यश
अमोल कोल्हे यांनी आपले सरकार केंद्रांबाबत केलेल्या मागणीला यश

 

*मीडिया वार्ता न्यूज*

     *जळगाव जिल्हा प्रतिनिधी* 

           *विशाल सुरवाडे*

जळगाव– सामान्य जनतेला आवश्यक शासकीय दस्तावेज व प्रमाणपत्र साठी भटकंती होऊ नये व त्यांना एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासनाने ई सेवा केंद्र , आपले सरकार केंद्र , सेतु केंद्र , आधार केंद्र इत्यादिची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे . ज्यामध्ये आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट , नॅशनॅलिटी सर्टिफिकेट , डोमिसाईल सर्टिफिकेट , शपथपत्र , रेशनकार्ड, राजपत्र अश्या अनेक सेवा उपलब्ध आहेत . सोबतच नागरिकांची आर्थिक लूट होवू नये म्हणून शासनाने यासाठी लागणारे शुल्क सुद्धा निश्चित करून दिलेले आहेत.

परंतु काही केंद्र संचालकांद्वारे केंद्रावर सेवानुसार शुल्कचा फलक (रेट बोर्ड) न लावल्याने नागरिकांमध्ये शुल्क विषयी संभ्रम निर्माण होतो व जास्तीचे शुल्क घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. शासनाने सर्वच केंद्रांसाठी सेवेनुसार एक समान दर निश्चित केलेले असूनही शुल्क फलक न लावल्यामुळे नागरिकांना शुल्कची माहिती मिळत नाही. नागरिक फसवणुकीला बळी पडतात.

जळगाव जिल्ह्याच्या शहर व ग्रामीण मधील सर्व ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतु केंद्र ,आधार केंद्र संचालकांना आपल्या केंद्रात शुल्क/दर फलक ( रेट बोर्ड ) लावणे विषयी अधिसूचना/आदेश करावेत. तसेच सदर आदशांनंतर देखील शुल्क फलक न लावता जास्त शुल्क घेणाऱ्या केंद्र संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून केंद्राचे लायसेंस रद्द करण्याचे त्या अधिसूचनेत प्रावधान करावे . अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केलेली होती व त्या मागणीसाठी पाठपुरावा केलेला आहे . त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सबंधितांना आपले सरकार सेवा केंद्रांवर दर फलक लावणे व शासन निर्णयाचे पालन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत .