पुलाचा बांधकामाला अवघे दोन महीणे ; गळती सूरू ; निकृष्ट बांधकाम झाल्याचा आरोप*

*पुलाचा बांधकामाला अवघे दोन महीणे ; गळती सूरू ; निकृष्ट बांधकाम झाल्याचा आरोप*

पुलाचा बांधकामाला अवघे दोन महीणे ; गळती सूरू ; निकृष्ट बांधकाम झाल्याचा आरोप*
पुलाचा बांधकामाला अवघे दोन महीणे ; गळती सूरू ; निकृष्ट बांधकाम झाल्याचा आरोप*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी

हीवरा परिसरातील शेकडो हेक्टर शेतीला पाणी वाहू नेणार्या कालव्यावरील पुलाचे बांधकाम करण्यात आले.बांधकामाला अवघे दोन महीणे झाले.पुलाचा स्लॕबमधून पाणी गळती सूरू आहे.अतिशय निकृष्ट बांधकाम झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.हा पुल कोसळल्यास शेकडो हेक्टरवर उभे असलेले धानपिक करपण्याची भिती आता शेतकऱ्यांना भेडसावित आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील येणाऱ्या हीवरा परिसरात शेकडो हेक्टर धानशेती आहे.या धानशेतीला जंगलात असलेल्या मोठ्या तलावातून पाणी पुरवठा केला जातो.मोठ्या तलावातील मुख्य कालवा हीवरा भागात गेला आहे.या कालव्यावर पाणी वाहून नेण्यासाठी दोन पुलाचे बांधकाम करण्यात आले.या बांधकामासाठी लघू पाठबंधारे विभाग चंद्रपूर यांनी 21 लाख रूपयाचा निधी मंजूर केला.घाईघाईने या दोन्ही पुलाचे बांधकाम केल्या गेले.बांधकामाला अवघ्या दोन महीण्याचा कालावधी झाला.बांधकामाचा निकृष्ट दर्जा आता समोर आला आहे.दोन्ही पुलाचा स्लॕबमधून पाणी झिरपत आहे. विभागाचा सूचनेनूसार काम झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.योगायोगाने हा पुल कोसळला तर शेकडो हेक्टरवरील धानपिक करपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हीवरा परिसरातील शेतीला सिंचन करणारा हा मुख्य कालवा आहे.याच कालव्यावर पुल बांधण्यात आले.पुलाचा दर्जा निकृष्ट आहे.या कामाची चौकशी करून निकृष्ट बांधकाम करणाऱ्या वर कार्यवाही करण्यात यावी.

निलेश पुलगमकार, सरपंच हीवरा